Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Monsoon Session : शाळांच्या मनमानीला आता चाप; केंद्र सरकारच्या शाळांनाही राज्य सरकारचे नियम लागू होणार?

  • प्रतिनिधी

Monsoon Session ​राज्यातील शाळांकडून शैक्षणिक साहित्य केवळ ठराविक दुकानांतूनच खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचा प्रकार आता गंभीर वळणावर पोहोचला आहे.

या प्रकरणावर विधान परिषदेत गुरुवारी तीव्र पडसाद उमटले असून, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील शाळांनाही राज्याच्या नियमावलीच्या चौकटीत आणण्याची आक्रमक मागणी केली आहे. (Monsoon Session)

​विधानपरिषद आमदार सुधाकर अडबाले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, कोणतीही शैक्षणिक संस्था केंद्र सरकारच्या नियंत्रणात असली तरी त्यांना राज्यात मनमानी करण्याचे स्वातंत्र्य नाही. ‘नियम हे सर्वांसाठी समान असावेत’ या भूमिकेतून त्यांनी राज्य शासनाला केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाशी त्वरित समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत. एवढेच नव्हे, तर राज्यातील खासदारांची मदत घेऊन या शाळांमधील कामकाजाची सखोल पडताळणी करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. (Monsoon Session)

​या गंभीर विषयाची दखल घेत शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी, डॉ. गोऱ्हे यांनी केलेल्या सर्व सूचनांवर सकारात्मक विचार करून तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहात दिले. सरकारच्या या भूमिकेमुळे शैक्षणिक साहित्याच्या सक्तीवरून पालकांची लूट करणाऱ्या शाळांना आता मोठी जरब बसेल, अशी चिन्हे दिसत आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Monsoon Session)

शैक्षणिक साहित्य, गणवेश खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या शाळांच्या मुजोरीला राज्य सरकारने थेट आव्हान

​पालकांना ठराविक दुकानातूनच महागडे शैक्षणिक साहित्य आणि गणवेश खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या शाळांच्या मुजोरीला आता राज्य सरकारने थेट आव्हान दिले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत अशा शाळांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. केवळ खासगीच नव्हे, तर सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळांनाही आता शासनाच्या नियमांच्या कचाट्यातून सुटका मिळणार नाही.(Monsoon Session)

​राज्यातील शाळांच्या या मनमानी कारभाराबाबत विधानपरिषद आमदार सुधाकर अडबाले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर चर्चा करताना, भाई जगताप, चित्रा वाघ आणि प्रवीण दरेकर यांनी या सक्तीमुळे पालकांची होत असलेली लूट चव्हाट्यावर आणली. यावर उत्तर देताना मंत्री भोयर यांनी स्पष्ट केले की, शिक्षण हे व्यावसायिक नसून ते समाजसेवेचे माध्यम आहे. त्यामुळे शैक्षणिक साहित्याची सक्ती कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही.(Monsoon Session)

​या प्रकरणाला आळा घालण्यासाठी शासन आता एक पाऊल पुढे गेले आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत आता ‘नोडल अधिकारी’ नेमले जाणार आहेत, जे शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवतील. लोकप्रतिनिधींनी सादर केलेल्या तक्रारींच्या आधारे अशा शाळांची एक स्वतंत्र यादी तयार करण्यात येणार असून, नियमभंग करणाऱ्या शाळांवर तातडीने दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पालकांच्या लुटीला मोठा चाप बसणार असून, आगामी शैक्षणिक वर्षात शाळांना नियमांचे पालन करणे आता अनिवार्य होणार आहे.(Monsoon Session)

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post