Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Monsoon Session : विधानभवनाच्या पायऱ्यांवर 'त्या' हस्तांदोलनाची चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण

  • प्रतिनिधी

​Monsoon Session राज्याच्या तापलेल्या राजकीय वातावरणात बुधवारी विधानभवन परिसरात घडलेल्या एका दृश्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि शिवसेना उबाठाचे आमदार मिलिंद नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानभवन परिसरात अचानक भेट झाली.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत नार्वेकरांशी हस्तांदोलन केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. (Monsoon Session)

​गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडी अत्यंत वेगवान झाल्या आहेत. शिवसेना उबाठातील खासदारांचे बंड आणि त्यानंतरची राजकीय समीकरणे पाहता, शिवसेना उबाठासाठी प्रत्येक हालचाल महत्त्वाची ठरत आहे. अशा तणावपूर्ण वातावरणात जेव्हा दोन परस्परविरोधी विचारधारेतील बडे नेते एकमेकांना भेटतात, तेव्हा त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे संकटमोचक मानले जातात, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सत्तेचे नवे समीकरण उभारले आहे. (Monsoon Session)

​या भेटीमागे राजकीय खेळी आहे की केवळ सौजन्यपूर्ण संवाद, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. मिलिंद नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जुने मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रुत आहेत. यापूर्वीही, बंडाच्या काळात आणि गणेशोत्सवादरम्यान झालेल्या त्यांच्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात अनेकदा चर्चेचे पेव फुटले होते. मात्र, प्रत्येक वेळी नार्वेकर यांनी आपली निष्ठा उद्धव ठाकरे यांच्याशीच असल्याचे सिद्ध केले आहे. ठाकरे यांनीही नार्वेकरांवर विश्वास दाखवत त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. (Monsoon Session)

​सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे शिवसेना उबाठा आपल्या आमदारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. त्यामुळेच, विधानभवन परिसरात झालेली ही भेट केवळ शिष्टाचाराचा भाग होती की त्यामागे काही छुपे संकेत आहेत, यावर सध्या उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. या हस्तांदोलनानंतर आता राजकीय पडद्यामागे नक्की काय शिजतंय, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Monsoon Session)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post