Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

MTNL Cable Theft चा पर्दाफाश; १ कोटींचा मुद्देमाल जप्त, चौकडीला अटक

  • प्रतिनिधी

MTNL Cable Theft महानगर टेलिफोन निगम लिमिटेड’ भूमिगत कॉपर केबलची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष-१० ने कारवाई करत चौघांना अटक केली असून, सुमारे १ कोटी ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पूर्व येथील वसंत मारवाल रोडवर असलेल्या मॅजिक लेन जवळ, क्लेरियन बिल्डिंगच्या समोरून ही चोरी झाली. ३० जून रोजी पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत आरोपींनी एमटीएनएलच्या परवानगीशिवाय भूमिगत कॉपर केबल चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. (MTNL Cable Theft)

एमटीएनएलचे उपव्यवस्थापक वीरेंद्र कुमार लता प्रसाद यादव यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखा कक्ष-१० च्या पथकाने तत्काळ तपास करत चौघांना बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे साहिल शकील शाह (२०), अब्दुल सिद्दीक अहमद शेख (३८), रिझवान मेहता मलिक शाह (२४) आणि मोहम्मद अफजल हसन खान (३५) अशी आहेत. (MTNL Cable Theft)

पोलिसांनी या कारवाईत चोरलेल्या ३९.४० लाख रुपयांच्या केबलसह गुन्ह्यात वापरलेली २० लाख रुपयांची दोन बोलेरो पिकअप वाहने, ४० लाख रुपयांची जेसीबी मशीन आणि ३१ हजार रुपयांचे दोन मोबाइल असा एकूण जवळपास १कोटी ५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.अब्दुल सिद्धीक अहमद शेख (३८) आणि अफजल हसन खान (३५)असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.या दोघांविरुद्ध नवघर, कांदिवली पोलीस ठाण्यात चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.मुंबईत मागील दोन वर्षात विविध पोलीस ठाण्यात एमटीएनएल ची केबल चोरी प्रकरणी १० गुन्हे दाखल असून या चोरीत या दोघांचा सहभाग आहे का याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (MTNL Cable Theft)

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०३(२), ३२४(५), ३(५) आणि दूरसंचार कायद्याच्या कलम ४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विशाल राजे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक अधिक तपास करत आहे. (MTNL Cable Theft)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post