Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mumbai Crime : लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच, उच्चशिक्षित तरुण पोहोचला पोलीस कोठडीत, नेमके काय घडले?

Mumbai Crime : लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच, उच्चशिक्षित तरुण पोहोचला पोलीस कोठडीत, नेमके काय घडले?

Mumbai Crime : लग्नाची बेडी अडकण्यापूर्वीच एका उच्चशिक्षित तरुणाला पोलिसांच्या बेडीत अडकण्याची नामुष्की ओढवली आहे. ऑनलाइन गेमिंग (Online gaming) आणि शेअर मार्केटच्या (Stock market) नादात लागलेल्या व्यसनापायी गुन्हेगारीच्या मार्गावर गेलेल्या एका २६ वर्षीय तरुणाला कुर्ला पोलिसांनी (Kurla Police) बेड्या ठोकल्या आहेत.

धवल नारायण अजमेरी (वय २६, रा. मुंब्रादेवी कॉलनी, दिवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Mumbai Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, धवलने बी. कॉम. पर्यंतचे शिक्षण घेतले असून तो एका हॉटेलमध्ये काम करत होता. मात्र, त्याला ऑनलाइन शेअर मार्केट आणि ऑनलाइन गेमिंगची तीव्र चटक लागली होती. घरची परिस्थिती हालाखीची असतानाही व्यसनांची पूर्तता करण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग निवडला. मुंबई आणि ठाण्या परिसरातील डॉमेट्रीमधून मोबाईल फोन लांबवून ते ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकणे, असा त्याचा बडदास्त होता. (Mumbai Crime)

१३ जुलै रोजी कुर्ला पश्चिम येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील ‘विवो मोबाईल सर्व्हिस सेंटर’मध्ये एक मोठी घरफोडी झाली होती. या दुकानातून तब्बल ४० पॅकबंद महागडे विवो मोबाईल (Vivo Mobile) आणि १ लाख ५० हजार रुपयांची रोकड असा ऐवज चोरट्यांनी लांबवला होता. या प्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. (Mumbai Crime)

कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास राठोड (Vilas Rathod) यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश बोराडे, पो.उ.नि.ज्ञानेश्वर निमजकर, शरद गोपाळ, पराग कापडणीस, दिपक पाटील, निलेश कांबळे, गणेश जयकर, नागेश काशिद, अनिल आहेर, रणजित तांबट, उमेश पाटील, आकाश गोगावले, रमेश सदगीर, सूरज बाबर, दत्ता होगले या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषकाच्या आधारे छडा लावला. कसून तपास करत पोलिसांनी मुख्य आरोपी धवल नारायण अजमेरी याला दादर (Dadar) पूर्व परिसरातून ताब्यात घेतले. (Mumbai Crime)

पोलीस चौकशीदरम्यान आरोपीने कुर्ल्यातील दुकानातून चोरलेले सर्व ४० मोबाईल फोन ‘ओलेक्स’ (OLX) या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत मोबाईल विकत घेणाऱ्या ग्राहकांचा शोध घेतला आणि चोरीचे सर्वच्या सर्व मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. (Mumbai Crime)

पोलीस तपासात समोर आले की, धवल अजमेरीविरुद्ध यापूर्वीच डोंबिवली, मुंब्रा, वांद्रे, पार्कसाईड, निर्मल नगर आणि साकिनाका पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे विविध गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, धवलचे नुकतेच लग्न ठरले होते आणि लवकरच त्याचा साखरपुडा होणार थाटामाटात पार पडणार होता; परंतु, त्याआधीच त्याच्या कृत्याने त्याच्या आनंदावर विरजण घातले असून, लग्नाच्या बेडीत अडकण्याआधीच त्याला पोलिसांच्या बेड्या लागल्या आहेत. सध्या कुर्ला पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Mumbai Crime)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post