Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

मुसळधार पावसाचा इशारा, घराबाहेर पडण्यापूर्वी 'या' गोष्टींची घ्या काळजी; मंत्री Girish Mahajan यांचे आवाहन

  • प्रतिनिधी

​Girish Mahajan राज्यात पावसाने जोर धरला असून, पुढील काही दिवसांत पावसाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, कोणत्याही प्रकारची जीवितहानी टाळण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण ताकदीनिशी तयारी केली आहे.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः मंत्रालयातील राज्य आपत्तकालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन यंत्रणेचा आढावा घेतला. (Girish Mahajan)

​राज्यात नद्या आणि नाले ओसंडून वाहत असल्याने सखल भागांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले की, भारतीय हवामान विभागाने ३ आणि ५ जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे हेच सुरक्षिततेसाठी गरजेचे आहे. (Girish Mahajan)

​मुंबईसह राज्यातील परिस्थितीवर सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. पावसाच्या पाण्यामुळे साचलेल्या ठिकाणी यंत्रणांनी तातडीने उपाययोजना केल्या असून, जनजीवन सुरळीत राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वाहतुकीवर होणारा परिणाम टाळण्यासाठी महानगरपालिका प्रशासनालाही विशेष निर्देश देण्यात आले आहेत. (Girish Mahajan)

​नागरिकांना कोणत्याही संकटाच्या वेळी मदतीसाठी खालील हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल :

  • राज्य आपत्तकालीन नियंत्रण कक्ष (२४x७) : १०७०, ०९३२१५८७१४३, ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९
  • ​जिल्हास्तरीय संपर्क क्रमांक : १०७७

​राज्यातील प्रत्येक नागरिकाने खबरदारी घ्यावी आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी केले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासकीय सूचनांकडे दुर्लक्ष न करता सतर्क राहणेच या पावसाळ्यात हितकारक ठरणार आहे. (Girish Mahajan)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post