Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Nagpur : दीड कोटींची इलेक्ट्रिक बस गायब; पण चोराने बस चोरून नेमकं काय केलं? पोलीसही चक्रावले

पोलिसांच्या दफ्तरी चोरीच्या अनेक घटनांची नोंद होत असते. यामध्ये चोरटे हे महागड्या दागिन्यांपासून ते वाहनांसारख्या अनेक वस्तूची चोरी करत असतात. पण नागपूरमध्ये एका चोराने चक्क एसटी महामंडळाची बस चोरी केली.

आणि तो अमलातही आणला. पोलिसांनी कारवाई करीत या चोरट्याला गजाआड केले. चोरल्या गेलेल्या या 'शिवाई' बसची किंमत १ कोटी५३ लाख रुपयांची आहे. या चोराने चौकशीदरम्यान दिलेली माहिती ऐकून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. (Nagpur)

या प्रकरणात नेमके घडले काय?
तारीख १ जुलै, रात्रीची वेळ नागपुरातील इमामवाडा बसस्थानकातील चार्जिंग स्टेशनवर एमएच ४९/बीझेड ८२५८ क्रमांकाची 'ई-शिवाई' बस उभी होती. ही बस या चोरट्याने पळवली. दरम्यान, गुरुवारी राजापेठ पोलीस ठाण्यातील बीट मार्शल नाईक पोलीस कॉन्स्टेबल सारंग आदमने आणि नाईक पोलीस कॉन्स्टेबल विजय धुर्वे यांना ही बस राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदा मार्केटजवळ उभी असल्याची माहिती मिळाली. बस चोरणारा चोरटा राजापेठ येथील गद्रे चौकात उभा असल्याचेही त्यांना कळले होते. बीट मार्शल आणि राजापेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने तत्काळ कारवाई करीत बस आणि चोरट्याला ताब्यात घेतले.

चौकशीमधून सत्य आले समोर
चौकशीदरम्यान चोराने त्याचे नाव विष्णू गणपती नीलावर (वय २३, रा. हईत नगर, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) असे सांगितले. १ जुलैला रात्री १ वाजताच्या सुमारास इमामवाडा बसस्थानक येथून चार्जिंगला असलेली बस आपण चोरली हे, आरोपीने कबूल केले. पण, त्याने पुढे दिलेली माहिती ऐकून पोलीसही चक्रावून गेले. आरोपीने आतापर्यंत तेलंगणा, आंध्रप्रदेशातून तब्बल वीस बसेस चोरल्या असून त्याने नांदेड येथील बस स्थानकावरून देखील एक बस चोरली आहे. या प्रकरणी वजिराबाद, सीसीएस पोलीस स्टेशन तिरूमला आणि इतर पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद आहे.

( – India-Japan Relations : पंतप्रधान मोदींकडून जपानी पंतप्रधानांचा 'धाकटी बहीण' असा उल्लेख! म्हणाले, "एका नव्या अध्यायाची…" )

चोरलेल्या बसचे चोर काय करतो?
बसची चोरी केल्यानंतर हा चोरटा एका सुरक्षित ठिकाणी बस उभी करतो. बसचे टायर्स, बॅटरी आणि डिस्क काढून घेतो आणि विकतो. ही बस आणि त्यातील साहित्य त्याच जागी ठेवून पसार होतो. ही त्याची चोरी केल्यानंतरची कार्यपद्धती आहे. पण, पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही चोरी पकडली गेली. चोरट्याही पोलिसांच्या तावडीत सापडला. सुमारे १ कोटी ५३ लाख रुपये किंमतीची ही इलेक्ट्रिक बस चोरी केल्याबद्दल नागपुरातील गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post