Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Narendra Modi यांची इंडोनेशियातील १ हजार वर्षे सर्वात जुन्या हिंदू मंदिराला भेट, पूजा-अर्चना करून म्हणाले.

Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इंडोनेशियातील योग्याकार्ता येथे असलेल्या 'प्रंबनन' या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराला भेट दिली. यावेळी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो त्यांच्यासोबत होते.

या दोन्ही नेत्यांनी मंदिराच्या जतन आणि जीर्णोद्धार प्रकल्पाचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी मंदिरात पूजा-अर्चनाही केली.

मंदिर परिसरात जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना ते म्हणाले, “मला नेहमीच कोणत्या ना कोणत्या रूपात भगवान शिवाशी जोडले जाण्याची संधी मिळाली आहे. सोमनाथ, काशी विश्वनाथ, केदारनाथ धाम आणि उज्जैनमधील महाकाल मंदिरानंतर आता प्रंबनन मंदिराच्या विकासकार्यात योगदान देण्याची संधी मिळणे हे माझे सौभाग्य आहे.”

गोव्यात महिंद्रा कंपनीच्या Thar गाडीवर येणार बंदी; कारण…

आज पंतप्रधान मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्याचा तिसरा आणि अंतिम दिवस आहे. आज संध्याकाळी ते इंडोनेशियाहून ऑस्ट्रेलियातील मेलबर्नसाठी रवाना होतील. त्यांचा ऑस्ट्रेलिया दौरा ८ ते १० जुलै या कालावधीत नियोजित आहे.

पंतप्रधानांनी प्रंबनन मंदिराच्या जतन आणि जीर्णोद्धार प्रकल्पाचे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, “कोणत्या ना कोणत्या रूपात भगवान शिवाशी जोडले जाण्याची संधी मिळणे, हे माझे सौभाग्य राहिले आहे.”

ते पुढे म्हणाले, “माझा जन्म वडनगरमध्ये झाला, जिथे प्रसिद्ध हाटकेश्वर महादेव मंदिर आहे. गुजरातमध्ये माझ्यावर सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या विकासाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. काशी हे माझ्या राजकीय जीवनाचे कार्यक्षेत्र आहे, जिथे मला नेहमीच काशी विश्वनाथाचा आशीर्वाद लाभला आहे.”

पंतप्रधानांनी पुढे सांगितले, “मला केदारनाथ धामचा पुनर्निर्माण आणि उज्जैनमधील महाकाल मंदिराचा विकास यांशी जोडले जाण्याची संधीही मिळाली. आता, प्रंबनन मंदिराच्या जीर्णोद्धार कार्याची सुरुवात होत असताना त्याचा एक भाग बनणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि भाग्याची गोष्ट आहे; हे मंदिर सुमारे १,००० ते १,२०० वर्षे जुने असून ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना समर्पित आहे. मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो.”

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post