Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

NASA : चंद्रावर कायमस्वरुपी मानवी तळ उभारण्याची योजना जाहीर, नासा ३ मोहिमा हाती घेणार; काय आहेत उद्दिष्टे? वाचा सविस्तर.

मेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नॅशनल एरोनॉटिक्स अँण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन'ने (NASA) चंद्रावर कायमस्वरुपी मानवी तळ उभारण्यासाठी तीन टप्प्यांची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे.

यासाठी तीन मोहिमा यंदा हाती घेण्यात येणार आहे.(NASA)

‘नासा’चे प्रशासक जेरेड आयझॅकमन यांनी पत्रकार परिषदेत २० अब्ज डॉलरच्या या योजनेची घोषणा केली. चंद्रावर बग्गी, ड्रोन आणि संशोधन उपकरणांनी सज्ज कायमस्वरुपी तळ उभारून कठीण वातावरणात राहण्याचे आणि काम करण्याचे तंत्र विकसित करण्याचा उद्देश आहे. “अमेरिका पुन्हा चंद्रावर जात आहे. चंद्रावरील तळ हा मानवाचा पृथ्वीबाहेरील पहिला कायमस्वरुपी तळ असेल.”, असे आयझॅकमन म्हणाले.(NASA)

( – Iran Us War : इराणने अमेरिकन तळांवर हल्ला चढवला, आखातात पुन्हा एकदा युद्धाचे सायरन ! )

नासाचे उद्दिष्ट

– २०२८मध्ये ‘आर्टिमिस-३’ मोहिमेद्वारे अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्याचे लक्ष्य निश्चित
– २०२९ ते २०३२ दरम्यान ऊर्जा ग्रीडसह कायमस्वरुपी पायाभूत सुविधा
– २०३२ नंतर नियमित मानवी उपस्थिती आणि सतत संशोधन मोहिमा
– हा तळ पूर्ण क्षमतेने कार्यरत झाला की, मानवाला चंद्रावर कायमस्वरुपी वास्तव्य करता येईल.

नासाचे चंद्र तळ मोहिम कार्यकारी अधिकारी कार्लोस गार्सिया गॅलन यांनी ही उद्दिष्टे सांगितली आहेत.(NASA)

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post