Dailyhunt

Nashik मध्ये धर्म बाटवण्याचा कट: बहुराष्ट्रीय कंपनीत महिलेचा लैंगिक छळ; ६ नराधमांना ठोकल्या बेड्या

नाशिकमध्ये भोंदू बाबा अशोक खरातचे (Ashok Kharat) प्रकरण ताजे असताना आणखी एक घटना समोर आली आहे. एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी (IT) कंपनीत लैंगिक शोषणाचे (Sexual Abuse) आणि धार्मिक भावना दुखावल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या छळाबाबत अखेर पीडित महिलेनी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक पोलीस आयुक्तांनी विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती केली आहे. या प्रकरणामुळे औद्योगिक क्षेत्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Nashik)

नऊ गुन्हे आणि सहा अटक
या संतापजनक प्रकरणात आतापर्यंत एकूण नऊ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये आठ तक्रार पीडित महिलेनी, तर एक तक्रार पुरुष कर्मचाऱ्याने दिली आहे. पोलिसांनी शब्बीर शेख, शफी शेख, रजा मेमन, आसिफ अन्सारी, शाहरुख कुरेशी आणि तौसीफ अत्तार या सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. पीडित महिलांनी असा आरोप केला आहे की, यातील काही आरोपींनी लग्नाचे आमिष दाखवून आणि काहीनी पदाचा गैरवापर करून त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. यातील पाच आरोपींना न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आणि एसआयटी तपासकेवळ लैंगिक अत्याचारच नाही, तर आरोपींनी पीडितेच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचवणारे कृत्य केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये (HR) अधिकाऱ्यावर देखील निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला असून, तक्रार करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचे समजते. पोलिसांनी शहरातील सर्व खाजगी आस्थापनांना महिला सुरक्षा धोरणांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post