Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Nepal Flood मध्ये २८८ भारतीय बेपत्ता, २१ जणांना वाचवले

Nepal Flood मध्ये २८८ भारतीय बेपत्ता, २१ जणांना वाचवले

नेपाळमधील पुरामुळे (Nepal Flood) २८८ भारतीय नागरिक बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी, २७ ऑगस्टला सांगितले की, आतापर्यंत २१ भारतीयांना वाचवण्यात आले आहे.

जयस्वाल म्हणाले, “पहिल्या गटात त्रिशुली-१ वीज प्रकल्पात काम करणारे ७३ लोक आहेत. त्यानंतर, सम्राट आणि फ्लाय एव्हरेस्ट ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून कैलास मानसरोवर यात्रेला गेलेले तामिळनाडूतील ३७ आणि ४९ नागरिकांचे दोन वेगवेगळे गट आहेत. रसुवा जिल्ह्यातील तिमुरे येथे सम्राट ट्रॅव्हल्सच्या मदतीने यात्रेला गेलेले पश्चिम बंगालमधील ३२ भारतीय नागरिकांचा एक गट आहे. त्यानंतर, विविध राज्यांतील ६१ भारतीय नागरिकांचा एक गट आणि केरळमधील ३३ भारतीय नागरिकांचा एक गट आहे. हे पाच मोठे गट असून, त्यात एकूण २८८ लोक आहेत. (Nepal Flood)

( Kurla Food Poisoning : अचानक उलट्या, ताप अन् चक्कर… मोमोज खाणं बेतलं जीवावर! १६ जणांना विषबाधा)

रणधीर जयस्वाल म्हणाले, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की कैलास मानसरोवर यात्रेला गेलेले अनेक भारतीय सध्या चीनच्या हद्दीत अडकले आहेत. सुमारे २०० भारतीय नागरिकांनी मदत मागितली आहे. चीनमधील आमचे दूतावास त्यांना सोडवण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत काम करत आहे. ईशा फाऊंडेशनचे सदस्यही अडकले आहेत. (Nepal Flood)

जयस्वाल म्हणाले, भारताने दोन विमानांमधून नेपाळला मदत साहित्य पाठवले आहे. १० टन मदत साहित्य पाठवण्यात आले आहे. आज सकाळी आणखी एक विमान ३७.५ टन मदत साहित्य घेऊन रवाना झाले, ज्यात ८ टन औषधांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयात एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. (Nepal Flood)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post