Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत भडका; 'सरकार' दरबारी दिलाशाची मागणी करत Jayant Patil यांनी सरकारला धरले धारेवर

प्रतिनिधी

​राज्यात महागाईचा भडका उडाला असतानाच आता इंधनाच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लावली आहे. या संकटाच्या काळात सामान्य जनतेला मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील ‘व्हॅट’ (VAT) व ‘सरचार्ज’ त्वरित रद्द करावा, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील(Jayant Patil)यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

( – 'Annapurna Yojna' लागू, अर्ज प्रक्रिया सुरू; महिलांना मिळणार मोठा लाभ )

​आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच देशाच्या अर्थव्यवस्थेवर तणाव निर्माण झाला आहे. यातच खाद्यतेल, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या असताना, इंधनाच्या दरात होणारी सलग दरवाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी ठरत आहे. गेल्या १० दिवसांत चार वेळा इंधन दरवाढ झाली असून, यामुळे मुंबईत पेट्रोल १११.१२ रुपये तर डिझेल ९६.८६ रुपये प्रति लिटरच्या घरात पोहोचले आहे.(Jayant Patil)

​जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात या परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. सध्या राज्यात पेट्रोलवर सुमारे २५ टक्के व्हॅट आणि १०.१२ रुपये सरचार्ज, तर डिझेलवर २४ टक्के व्हॅट आणि ३ रुपये सरचार्ज आकारला जात आहे. जर राज्य सरकारने हे जाचक कर रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला, तर पेट्रोल आणि डिझेलचे दर थेट ७० ते ८० रुपयांच्या आसपास येऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. या कठीण आर्थिक परिस्थितीत जनतेला वाचवण्यासाठी सरकारने राजकीय मतभेद बाजूला ठेवून तत्काळ पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. आता मुख्यमंत्री या मागणीवर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.(Jayant Patil)

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post