Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
PM Modi यांना अश्लील शिवीगाळ करणाऱ्या रुचिकाविरुद्ध  गुन्हा दाखल; कुटुंबासह गेली पळून

PM Modi यांना अश्लील शिवीगाळ करणाऱ्या रुचिकाविरुद्ध गुन्हा दाखल; कुटुंबासह गेली पळून

जंतर मंतर येथील सीजेपी आंदोलनादरम्यान पंतप्रधानांविरुद्ध (PM Modi) आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील नोएडा एक्सप्रेसवे पोलीस ठाण्यात एका तरुणीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ग्रेटर नोएडा येथे आरोपीविरोधात झिरो एफआयआर देखील नोंदवण्यात आला आहे. गाझियाबादच्या इंदिरापुरम येथे राहणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या वकील स्मृती सिंह यांच्या तक्रारीच्या आधारे, नोएडा सेक्टर १६८ येथील रहिवासी असलेल्या रुचिका सिंह यांच्याविरोधात बीएनएस २०२३ च्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुचिका सिंह एक ब्युटी पार्लर चालवते. आक्षेपार्ह टिप्पणी करतानाचा तिचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा केला जात आहे. (PM Modi)

तक्रारीत हेतुपुरस्सर द्वेष भडकवणे, सामाजिक तणाव निर्माण करणे आणि शांततेचा भंग केल्याचा आरोप आहे. आरोपी रुचिका सिंग हिला पोलिसांनी अद्याप ताब्यात घेतलेले नाही. पोलीस सध्या व्हिडिओ फुटेज आणि इतर पुराव्यांची तपासणी करत असून, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. पोलीस रुचिका सिंगच्या सोशल मीडिया खात्यांचीही चौकशी करत आहेत. तिने व्हिडिओमध्ये मॅलोनी यांचा उल्लेख केला होता आणि पंतप्रधान मोदींविरोधात (PM Modi) अपमानास्पद भाषा वापरली होती. हा व्हिडिओ व्हायरलही झाला होता.

( Heavy Rain : महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; भारतातील २२ राज्यांना हवामान खात्याचा इशारा)

या प्रकरणात सार्वजनिक ठिकाणी घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्तींविरुद्ध अपमानजनक भाषेचा वापर केल्याचा समावेश आहे. भारतीय दंड संहितेव्यतिरिक्त, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांचाही वापर केला जाऊ शकतो. वकील स्मृती सिंह यांनी सांगितले की, पंतप्रधानांचे (PM Modi) पद राष्ट्राच्या प्रतिष्ठेशी जोडलेले आहे. ते राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात आणि आक्षेपार्ह वक्तव्ये करून या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. यामुळे जनभावना दुखावल्या गेल्या आहेत. जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान अनेक लोकांनी पंतप्रधान मोदींविरुद्ध (PM Modi) अपमानजनक भाषेचा वापर केला होता. बॅनर आणि पोस्टरवरही आक्षेप घेण्यात आले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post