Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

PM Narendra Modi हे नेहरूंनंतरचे सर्वात प्रभावशाली नेते; शशी थरूर यांनी कोणत्या शब्दांत केले कौतुक?

स्वातंत्र्यानंतर भारताला नवी दिशा देणाऱ्या तीन सर्वात प्रभावशाली नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे नाव निःसंशयपणे घेतले जाऊ शकते, असे गौरवोद्गार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. शशी थरूर यांनी काढले आहेत.

एका विशेष लेखात त्यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळातील प्रगतीचा आढावा घेतला असून, मोदींचा वारसाच २१ व्या शतकातील भारताची दिशा ठरवेल, असे म्हटले आहे.

केरळमधील तिरुवनंतपुरमचे खासदार असलेल्या शशी थरूर यांनी यापूर्वीही पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वक्षमतेचे कौतुक केले आहे. मात्र, त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षातील अनेकांनी वारंवार नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे. शशी थरूर यांनी आपल्या अलीकडील लेखात मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाने साधलेली प्रगती आणि त्याच वेळी निर्माण झालेल्या काही चिंता, अशा दोन्ही बाजूंचे तटस्थ मूल्यांकन केले आहे.

( Veer Savarkar : 'दया याचिकांमुळे नव्हे, तर जनमतामुळे झाली सावरकरांची सुटका'; वीर सावरकर बदनामी प्रकरणातील उलटतपासात सात्यकी सावरकर यांचे स्पष्टीकरण)

थरूर यांनी भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर थेट विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आहे. गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात आर्थिक सुधारणा, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि शासकीय कार्यक्षमतेत मोठी प्रगती झाली आहे, ज्यामुळे भारताचे चित्र बदलले असल्याचे त्यांनी नमूद केले. हा आढावा २१ व्या शतकात भारताची प्रगती कशी होईल, याबद्दल महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी देतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नेहरूंचा विक्रम मोडीत

दरम्यान, १० जून रोजी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे देशाचे सर्वाधिक काळ पदावर राहिलेले निर्वाचित (लोकशाही मार्गाने निवडून आलेले) पंतप्रधान बनले आहेत. त्यांनी पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर सलग ४,३९८ दिवस पदभार सांभाळणारे भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post