Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Pune Census Staff Assaulted : पुण्यात जनगणना करणाऱ्या कर्मचारी महिलेला मारहाण; महापालिका आयुक्तानी दिले गुन्हे दाखल करण्याचे आदेश

पुण्यामध्ये राष्ट्रीय जनगणनेचे (Census) काम करणाऱ्या एका महिला शासकीय कर्मचाऱ्याला काही नागरिकांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम (Naval Kishore Ram) यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना तात्काळ पत्र लिहिले आहे.

महिला कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. या घटनेमुळे सध्या घरोघरी जाऊन माहिती गोळा करणाऱ्या प्रगणकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Pune Census Staff Assaulted)

नागरिकांमधील गैरसमज आणि वाद
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक भागांत, विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये नागरिकांमध्ये या सर्वेक्षणाबाबत मोठा गैरसमज निर्माण झाला आहे. जनगणना करण्यासाठी आलेले कर्मचारी हे अनधिकृत बांधकामे शोधण्यासाठी किंवा घरे पाडण्यासाठी आले आहेत, अशी भीती नागरिकांच्या मनात आहे. या भीतीपोटी रहिवासी आपल्या कुटुंबाची योग्य माहिती देण्यास टाळाटाळ करतात आणि कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात. या वादामधूनच मारहाणीचे प्रकार घडत असल्यामुळे आता संवेदनशील भागात पालिकेचे सुरक्षारक्षक तैनात केले जाणार असून पोलिसांची गस्त वाढवली जाणार आहे. (Pune Census Staff Assaulted)

कर्तव्य बजावताना शिक्षकांचा मृत्यू; भरपाईची मागणी
दुसरीकडे, जनगणनेच्या कामावर जात असताना मावळ जवळील कान्हे फाटा येथे दीपाली तांबे या महिला शिक्षिकेचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. राज्यातील अशा प्रकारची ही चौथी घटना असून, यापूर्वी कोल्हापूर, लातूर आणि सांगोला येथील तीन कर्मचाऱ्यांचाही वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षक महासंघाने आक्रमक पवित्रा घेतला असून, कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या प्रगणकांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान आणि अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी देण्याची मागणी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post