Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune News : पुण्यात रिक्षा प्रवास महागणार; भाडेवाढीच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरीची शक्यता

Pune News : पुण्यात रिक्षा प्रवास महागणार; भाडेवाढीच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरीची शक्यता

Pune News पुणे शहरातील रिक्षा प्रवाशांना लवकरच वाढीव भाड्याचा सामना करावा लागू शकतो. रिक्षा संघटनांच्या मागणीनुसार पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला असून तो प्रादेशिक परिवहन समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी तथा समितीचे पदसिद्ध अध्यक्ष जितेंद्र डुडी यांच्या मंजुरीनंतर नवीन दर लागू होण्याची शक्यता आहे. (Pune News)

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे सीएनजीसह इंधनाच्या दरात झालेल्या वाढीचा परिणाम रिक्षा व्यवसायावर होत असल्याचे सांगत रिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करून प्रादेशिक परिवहन समितीकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. (Pune News)

प्रस्तावाला समितीच्या आगामी बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता असून, मंजुरीनंतर पुणे शहरात नवीन भाडेदर लागू केले जाणार आहेत.प्रस्तावानुसार, रिक्षाच्या पहिल्या दीड किलोमीटरच्या प्रवासासाठी सध्या आकारले जाणारे २५ रुपये वाढवून ३० रुपये करण्यात येणार आहेत. तसेच त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठीचे भाडे १७ रुपयांवरून २० रुपये करण्याचा प्रस्ताव आहे.रिक्षाचालकांचे वाढते इंधन खर्च, वाहनांच्या देखभाल खर्चात झालेली वाढ आणि व्यवसायावरील आर्थिक ताण लक्षात घेऊन ही भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. (Pune News)

  • सध्याचे दर : पहिल्या दीड किलोमीटरसाठी २५ रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १७ रुपये.
  • प्रस्तावित नवे दर :पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी २० रुपये.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post