Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Rain Update: राज्यात पुढील ५ दिवस जोरदार पाऊस, कोणत्या भागांत रेड अलर्ट जारी?कसे असेल हवामान?जाणून घ्या.

Rain Update: हवामान विभागाने पुढील ५ दिवस (बुधवार,८जुलै)पासून मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणि आणि नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पालघर, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट आणि सातारा घाटांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

कोकणात रेड-ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसासाठी येलो अलर्ट आहे.

– Monsoon Tourism Restrictions Maharashtra : ३ सप्टेंबरपर्यंत धबधब्यांसह धरणे, नदीकाठावर जाण्यास बंदी

कोकण, विदर्भ, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र…

कोकण : कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा असल्याने नागरिकांनी पूर, वादळ आणि विजांच्या धोक्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

विदर्भ: भंडारा, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस, तर लातूर आणि धाराशिवमध्ये हलक्या पावसाच्या सरींची शक्यता.

मध्य महाराष्ट्र: धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज, तर सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये हलक्या पावसाची शक्यता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post