Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राज्यातील मतदारांना मोठा दिलासा! SIR प्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ; कधीपर्यंत फॉर्म भरता येणार?

राज्यातील मतदारांना मोठा दिलासा! SIR प्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ; कधीपर्यंत फॉर्म भरता येणार?

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्याकडून होणाऱ्या गृहभेटी आता ८ ऑगस्टऐवजी १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरू राहतील.(Maharashtra SIR Deadline Extended)

याशिवाय, प्रारूप मतदार यादी १७ ऑगस्टऐवजी २४ ऑगस्ट रोजी प्रकाशित केली जाईल. त्यावर २३ सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. प्राप्त दावे-हरकतींवरील सुनावणी आणि निकाली काढण्याची प्रक्रिया २२ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाईल. यानंतर अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यापूर्वी ही यादी १९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार होती.(Maharashtra SIR Deadline Extended)

महिन्याभरात दुसरी मुदतवाढ

मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेला निवडणूक आयोगाने दिलेली ही दुसरी मुदतवाढ आहे. यापूर्वी १७ जुलै रोजी राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुदत वाढवून मागितली होती. त्यावेळी मुदत २९ जुलैवरून ८ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, आता यात पुन्हा सुधारणा करण्यात आली आहे.

हेही पाहा:

https://youtu.be/tKqYv3BF0e4

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post