Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

रखडलेल्या जीपीएफ पावत्यांसाठी ३ महिन्यांत विशेष शिबिरे; राज्यमंत्री Dr. Pankaj Bhoyar यांची मोठी घोषणा

  • प्रतिनिधी

Dr. Pankaj Bhoyar ​यवतमाळ जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना त्यांच्याच भविष्य निर्वाह निधीच्या (GPF) पावत्या मिळवण्यासाठी करावी लागणारी वणवण आता राज्य सरकारसाठी चिंतेचा विषय ठरली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई आणि येत्या तीन महिन्यांत विशेष शिबिरे घेण्याची घोषणा केली आहे. (Dr. Pankaj Bhoyar)

​विधान परिषदेत उपस्थित झालेल्या या प्रश्नावर बोलताना मंत्री भोयर यांनी स्पष्ट केले की, शिक्षकांचा हा हक्काचा विषय असून पावत्या वितरणातील दिरंगाई कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. अमरावती विभागाच्या उपसंचालकांमार्फत या संपूर्ण प्रकरणाची १५ दिवसांत सखोल चौकशी करण्यात येईल. यात जर कुणी जाणीवपूर्वक दिरंगाई केली किंवा निष्काळजीपणा केल्याचे आढळले, तर संबंधित अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला. (Dr. Pankaj Bhoyar)

​यवतमाळ जिल्ह्यात ३९१ शाळांमधील ३,०१२ शिक्षक जीपीएफधारक आहेत. यापैकी १,५५८ शिक्षकांनाच आतापर्यंत पावत्या मिळाल्या असून, तब्बल १,४५४ शिक्षकांच्या पावत्या अजूनही रखडलेल्या आहेत. ही स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे मान्य करत, उर्वरित शिक्षकांना तातडीने पावत्या मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. तसेच, भविष्यात ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी जीपीएफची माहिती ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध करून देण्याचे संकेतही मंत्र्यांनी दिले आहेत. सरकारच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता रखडलेल्या पावत्यांचा प्रश्न सुटण्याची आशा शिक्षकांना लागली आहे. (Dr. Pankaj Bhoyar)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post