Dailyhunt

Ratnagiri: गणपतीपुळेच्या समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाचे 'सर्च ऑपरेशन'; LED मासेमारी करणाऱ्या 3 बोटी जप्त

मुद्रातील अवैध LED मासेमारीविरोधात (Ratnagiri) मत्स्यव्यवसाय विभागाने 'ऑपरेशन क्लीन-सी' ही धडाकेबाज मोहीम हाती घेतली असून, जयगड ते दाभोळपर्यंत समुद्रकिनाऱ्यावर सलग कारवाया सुरू आहेत.

नियम मोडणाऱ्या मच्छीमारांवर 'नो मर्सी' धोरण राबवत विभागाने समुद्रात अक्षरशः सर्च ऑपरेशन उघडले आहे. त्यानुसार, गुहागर, गणपतीपुळे दरम्यान मत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट समुद्रात उतरुन नौकांवर कारवाई केली आहे. (Ratnagiri)

ऑपरेशन क्लीन-सी मोहिमेअंतर्गत जयगड बंदर परिसरात मध्यरात्री टाकलेल्या धाडीत 3 नौका रंगेहाथ पकडण्यात आल्या. अंधाराच्या आड LED लाईटचा वापर करून सुरू असलेली अवैध मासेमारी पथकाने वेळीच उधळून लावली. दरम्यान, 3 एप्रिल रोजी मध्यरात्री 2.17 वाजता मिरकरवाडा-गणपतीपुळे दरम्यान गस्तीदरम्यान "भराडी प्रसन्न" (IND-MH-04-MM-3723) ही नौका LED लाईटसह पकडून जप्त करण्यात आली. ही कारवाई अतिशय जलद आणि अचूक पद्धतीने पार पडली. (Ratnagiri)

- Online Gaming Fraud : मुलांनाच लक्ष्य का केले जाते? काय आहेत याची कारणे?

त्यानंतर ७ एप्रिल रोजी रात्री १० वाजता गुहागर-दाभोळ दरम्यान पुन्हा कारवाई करत "सफा मरवा-1" (IND-MH-4-MM-4041) ही नौका LED द्वारे अवैध मासेमारी करताना रंगेहाथ पकडण्यात आली. संबंधित नौका दाभोळ बंदर येथे जप्त करण्यात आली आहे. या संयुक्त कारवाईत परवाना अधिकारी दिप्ती साळवी (दाभोळ), स्वप्निल चव्हाण (गुहागर), सागरी सुरक्षा पर्यवेक्षक प्रशांत येलवे, विनायक शिंदे तसेच सुरक्षा रक्षक राजन शिंदे, योगेश तोस्कर आणि प्रतीक शिर्के यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. (Ratnagiri)

- बलिदान युएईचे, मध्यस्थी Pakistan ची आणि फायदा इराणचा; UAE च्या संतापाने मध्यपूर्वेतील मैत्रीचा बुरुज ढासळणार?

सर्व प्रकरणांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारित अध्यादेश 2021 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असून, प्रकरणे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्याकडे न्यायनिर्णयासाठी सादर केली जाणार आहेत. ही संपूर्ण मोहीम सहाय्यक आयुक्त सागर कुवेस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या निर्देशानुसार LED मासेमारी करणाऱ्यांवर आता थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. (Ratnagiri)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post