Dailyhunt

शिक्षकांच्या Summer Vacation अधांतरी; या वेळी निवडणूक नाही, तर 'हे' आहे कारण

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ संपुष्टात येत असून, ३० एप्रिल पासून शाळा उन्हाळी सुट्ट्यांसाठी (Summer Vacation) बंद होतील. नवीन शैक्षणिक सत्र २०२६-२७ २६ जूनपासून सुरू होईल. मात्र, यंदा शिक्षक वर्गासाठी ही दीर्घ सुट्टी अपेक्षेप्रमाणे सुस्पष्ट आनंदाची राहणार नाही.

जिल्हा परिषद, नगर परिषद तसेच खासगी आणि स्वयंशासकीय शाळांतील शिक्षकांना यंदा सुट्टीचा पूर्ण लाभ मिळणार नाही, कारण डिजिटल जनगणना प्रक्रिया यंदा सुरू होणार आहे. जनगणना (Census) आयोगाच्या सूचनेनुसार एप्रिल व मे महिन्यात शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू होईल, आणि या राष्ट्रीय मोहिमेत शिक्षकांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.

विशेष म्हणजे, जनगणनेसाठी नियुक्त शिक्षकांना १६ मे ते १५ जून या कालावधीत मुख्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असून, या काळात मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. गत दोन वर्षात निवडणूक कामात गुंतलेल्या शिक्षकांना आता पुन्हा जनगणनेच्या जबाबदाऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे.

या निर्णयामुळे शिक्षकांच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होणार आहे. लग्न समारंभ, घरगुती कार्यक्रम, पर्यटन अशा नियोजित गोष्टी रद्द करण्याची वेळ आली आहे. ग्रामीण व शहरी भागातील शिक्षकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ‘राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी आणि वैयक्तिक आयुष्यावरील मर्यादा’ या संतुलनामुळे यंदाची उन्हाळी सुट्टी शिक्षकांसाठी खऱ्या अर्थाने सुट्टी न राहता कर्तव्याची परीक्षा ठरणार असल्याचे दिसून येते. (Summer Vacation)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post