विशेष गहन पुनर्परीक्षण (SIR) देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रक्रियेत शासकीय यंत्रणेला एक जबाबदार नागरिक म्हणून सहकार्य करणे आवश्यक आहे. कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय कार्यक्रमात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केले.
‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स’, येथे भाजपाच्या वतीने मतदार यादी (Voter List) अद्ययावत करणे आणि बूथ स्तरावरील कार्यकत्यांना प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने ‘विशेष गहन पुनरीक्षण’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
अमरावती शहर-जिल्हा, ग्रामीण मेळघाट आणि मोर्शी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे (BJP) संघटकांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ‘एसआयआर’ कार्यशाळेचे महाराष्ट्र संयोजक म्हणून किरीट सोमैय्या आणि सहसंयोजक म्हणून नितीन भुतडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोमय्या पुढे म्हणाले की, बीएलए१ यांनी विधानसभानिहाय तयार करण्यात आले आहे. हे बीएलए (BLA) लवकरच बुथनिहाय ‘बीएलए-२’ तयार करतील. याची ९० टक्के तयारी पूर्ण करण्यात आली आहे. हे बीएलए शासनाच्या ‘एसआयआर’ला मदत करतील. यासंदर्भातील कार्यशाळा गेल्या १७ मार्च रोजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि राष्ट्रीय महामंत्री तरूण चुघ यांच्या उपस्थितीत झाली होती.
त्या वेळी आखलेल्या रूपरेषेनुसार ही कार्यशाळा पार पडली. या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदेश संयोजक किरिट सोमय्या, सह संयोजक नितीन भुतडा यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी खा. अनिल बोंडे, जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, प्रभुदास भिलावेकर, भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, महापौर श्रीचंद तेजवानी, पक्षनेता चेतन गावंडे, राज्य उपाध्यक्ष जयंत डेहनकर उपाध्यक्ष तुषार भारतीय यांच्यासह भाजपाचे तालुका पदाधिकारी, संघटन उपस्थित होते.
हेही पहा –
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post