Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Strait of Hormuz ला रणांगण बनवू नका, नाहीतर.; इराणने ब्रिटन आणि फ्रान्सला दिल्या धमक्या

मेरिकेसोबतच्या शांतता चर्चेदरम्यान, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत (Strait of Hormuz) पुन्हा एकदा इशारा दिला आहे. इराणचे उप परराष्ट्र मंत्री, काझेम गरीबाबादी यांनी धमकी दिली आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) हे जगभरातील देशांना लष्करी शक्तीचे प्रदर्शन करण्याचे व्यासपीठ नाही.

इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत (Strait of Hormuz) एक संयुक्त निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये गरीबाबादी यांनी म्हटले आहे की, या प्रदेशाला (होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या प्रदेशाला) धोका निर्माण करणाऱ्या शक्तींना परिणामांसाठी जबाबदार धरले जाईल.

इराणच्या नेत्याने ‘एक्स’ पोस्टमध्ये काय दिली धमकी?

शनिवारी (४ जुलै, २०२६), इराणचे परराष्ट्र मंत्री, काझेम गरीबाबादी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली. त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हटले आहे,”होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) हे बाह्य शक्तींना लष्करी शक्तीचे प्रदर्शन करण्याचे व्यासपीठ नाही. सामुद्रधुनीच्या (Strait of Hormuz) सुरक्षेसाठी जबाबदार देश आणि तिच्या सुरक्षेचा हमीदार म्हणून इराण, या जलमार्गातील कोणत्याही लष्करी हालचालींवर गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने लक्ष ठेवून आहे. ते म्हणाले, “होर्मुझच्या सामुद्रधुनीची (Strait of Hormuz) सुरक्षा ही किनारपट्टीवरील राष्ट्रांची जबाबदारी आहे, आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही शक्तींना त्यांच्या उद्दामपणाच्या परिणामांसाठी जबाबदार धरले जाईल. हा एक गंभीर इशारा आहे.

( Vaibhav Sooryavanshi आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आणि त्याने सचिन तेंडुलकरचा ३७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला)

फ्रान्स आणि युकेने त्यांच्या संयुक्त निवेदनात काय म्हटले?

दुसरीकडे, युके आणि फ्रान्सने जारी केलेल्या एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, ओमानने आपल्या सार्वभौम प्रादेशिक जलक्षेत्रातून जहाजांच्या सुरक्षित प्रवासाची खात्री करण्यासाठी युके आणि फ्रान्ससोबत काम करण्यास सहमती दर्शवली आहे. शनिवारी (४ जुलै, २०२६) दोन्ही देशांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, “होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वपूर्ण सागरी मार्ग आहे. या सामुद्रधुनीतून सर्व देशांच्या जहाजांचा सुरक्षित मार्ग पुन्हा सुरू करणे ही संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब आहे. ओमानच्या सुलतानांनी आपल्या सार्वभौम जलक्षेत्रातून जहाजांचा सुरक्षित मार्ग सुनिश्चित करण्यासाठी यूके आणि फ्रान्ससोबत काम करण्यास सहमती दर्शवली आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये (Strait of Hormuz) जहाजांचा मुक्त मार्ग सुनिश्चित करण्यासाठी यूके आणि फ्रान्स एक मोठी बहुराष्ट्रीय लष्करी मोहीम तैनात करण्यासही तयार आहेत. यूके आणि फ्रान्स प्रादेशिक स्थैर्य, सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर आणि जागतिक सुरक्षा, नौकानयनाचे स्वातंत्र्य व आंतरराष्ट्रीय कायद्याचे संरक्षण करण्यासाठी आपल्या भागीदारांसोबत घनिष्ठ सहकार्य कायम ठेवण्याच्या आपल्या सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतात. (Strait of Hormuz)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post