Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Teejan Bai Passes Away : प्रख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे निधन; पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

त्तीसगडच्या प्रख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या डॉ. तीजन बाई यांचे रायपूर येथील एम्स रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्या गंभीर आजारांशी झुंज देत होत्या.

दरम्यान रविवारी पहाटे ३.१५ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे छत्तीसगडसह संपूर्ण देशाच्या सांस्कृतिक आणि कला जगतावर शोककळा पसरली आहे.(Teejan Bai Passes Away)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

तीजन बाई यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एक्सवर पोस्ट करत त्यांनी लिहिले, “सुप्रसिद्ध पंडवानी गायिका तीजन बाई यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांनी छत्तीसगढच्या या लोककलेला त्यांच्या भव्य सादरीकरणातून जगभरात एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या निधनानंतर कला व संस्कृतीच्या क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे जाण्याने कला व संस्कृतीच्या क्षेत्रातील जे नुकसान झाले आहे, ते नुकसान कधीही निघणार नाही”, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीजन बाईंना श्रद्धांजली वाहिली.(Teejan Bai Passes Away)

भारतीय लोककलेतील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले होते. त्यांना भारत सरकारकडून १९८७ मध्ये पद्मश्री, २००३ मध्ये पद्मभूषण आणि २०१९ मध्ये ‘पद्मविभूषण’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.(Teejan Bai Passes Away)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post