दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी पाकिस्तानच्या आयएसआय आणि मुंबई अंडरवर्ल्ड नेटवर्कसाठी काम करणाऱ्या नऊ हस्तकांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.
हे नेटवर्क दाऊद इब्राहिमशी निगडित गुन्हेगारी जगताशी संबंधित होते. दिल्लीतील महत्त्वाच्या आस्थापना, सुरक्षा कर्मचारी आणि धार्मिक स्थळांवर हल्ला करण्याचे काम त्यांना सोपविण्यात आले होते, अशी माहिती समोर येत आहे. (Terrorist)
अटक केलेल्या दहशतवाद्यांचा (Terrorist) दिल्ली, मुंबई आणि पंजाबशी संबंध आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांमध्ये कथितरित्या एका विदेशी व्यक्तीचाही समावेश आहे. अटकेच्या कारवाई दरम्यान शस्त्रे, हँड ग्रेनेड, स्फोटके आणि इतर गुन्हेगारी पुरावे जप्त करण्यात आले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वपूर्ण कारवाई असल्याचे तपासकर्त्यांनी सांगितले. प्राथमिक तपासात, अटक केलेल्या व्यक्तींचा पाकिस्तानमधील सूत्रधारांशी, तसेच मुंबई अंडरवर्ल्डमधील नेटवर्कशी संपर्क होता. सुरक्षा यंत्रणांचे या मॉड्यूलवर काही काळापासून नजर होती. दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा त्यांचा प्लॅन होता, अशी प्राथमिक माहिती तपासातून उघड झाली आहे. (Terrorist)
