Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
"टिळकांच्या नजरेतून भगवद्गीता वाचा, तुम्ही आयुष्यात."; केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांचा तरुणांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?

"टिळकांच्या नजरेतून भगवद्गीता वाचा, तुम्ही आयुष्यात."; केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांचा तरुणांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील योगदानासाठी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री उदय सामंत, रवींद्र चव्हाण, यांच्यासह भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. गुलटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या मैदानावर पुरस्कार प्रदान कार्यक्रम पार पडला.(Amit Shah On Ajit Doval Pune)

टिळकांच्या नजरेतून भगवद्गीता वाचा, आयुष्यात चुका होणार नाही

अमित शाहांनी यावेळी लोकमान्य टिळकांच्या देशाच्या स्वातंत्र्यातील योगदानाचा आढावा घेतला. “लोकमान्य टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान मोठं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील स्वराज्याची याच मातीत घोषणा केली. मला लोकमान्य टिळकांचा गीतारहस्य हा ग्रंथ गुजरातीत मिळाला. माझे तरुणांना आवाहन आहे की, तुम्ही लोकमान्य टिळकांच्या नजरेतून भगवद्गीता वाचा, तुम्ही आयुष्यात कधीच चुकीच्या मार्गाने जाणार नाही, याची मी खात्री देतो. हा ग्रंथ श्रीमद्भगवद्गीतेचे व्यावहारिक रूप असून, एक सामान्य नागरिक, विद्यार्थी किंवा तरुण दररोजच्या आयुष्यात भगवद्गीता कशी जगू शकतो, याचे उत्तम मार्गदर्शन टिळकांनी या ग्रंथातून दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच टिळकांचे लिखाण कधीच कालबाह्य होणार नाही, ते शाश्वत आहे”, असे सांगत त्याचे वाचन करण्याचे आवाहन अमित शाह यांनी यावेळी केले आहे.(Amit Shah On Ajit Doval Pune)

इंग्रज केसरीला घाबरायचे

इंग्रज केसरी आणि मराठा वृत्तपत्रांना घाबरत होते. त्यात टिळकांचे मोठे योगदान होते. राष्ट्राच्या चेतनेला जागवल्याशिवाय स्वातंत्र्य मिळत असेल तर त्याला काही मूल्य नाही. राष्ट्राची चेतना जागवूनच स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असे ते म्हणायचे. त्यांनी अनेक उत्सवाच्या माध्यमातून लोकांना संघटीत करण्याचं काम केले, असे शाह म्हणाले.(Amit Shah On Ajit Doval Pune)

अजित डोवाल यांच्या टिप्समुळे देशातील १३ बॉम्बस्फोटांचा उलगडा

“मी गुजरातचा गृहमंत्री असताना साखळी बॉम्बस्फोट झाले होते, त्यावेळी माझी आणि त्यांची ओळख नव्हती. पण, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांनी केवळ बॉम्बस्फोट नाही तर त्यामागे असणारे लोक आणि देशात झालेल्या बॉम्बस्फोटांचा तपास करायला सांगितले आणि यासाठी डोवाल यांची मदत घेण्याचा सल्ला मोदींनी दिला. डोवाल आणि माझी चर्चा झाली. यावेळी डोवाल यांनी दिलेल्या माहितीमुळे गुजरात पोलिसांनी अहमदाबादच नव्हे तर देशातील १३ बॉम्बस्फोटांचा यशस्वीपणे तपास केला होता”, अशी आठवण अमित शाहांनी यावेळी सांगितली.(Amit Shah On Ajit Doval Pune)

“पंतप्रधान मोदींनी सर्वांत पहिल्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या निवडीचा निर्णय घेतला होता. आजचे परराष्ट्र धोरण देशाचा पाठीचा कणा झाली आहे. डोवाल यांना देशाचे सर्वाधिक राहिलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ठरले आहेत”, असे शाह म्हणाले.(Amit Shah On Ajit Doval Pune)

अजित डोवाल यांच्या योगदानाचे कौतुक

“लष्कराची क्षमता वाढविण्यात आणि त्यात अमूलाग्र बदल पंतप्रधान मोदींनी गेल्या १२ वर्षात गेला आहे. यात अजित डोवाल यांचे मोठे योगदान आहे. शुद्ध आणि जन्मजात देशभक्ताचा सन्मान केला आहे”, अशा शब्दात शाहांनी अजित डोवाल यांच्या कतृत्वाचे आणि योगदानाचे कौतुक करत पुरस्कारासाठी टिळक स्मारक ट्रस्टचे देखील आभार मानले.(Amit Shah On Ajit Doval Pune)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post