Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Ukraine Drone attack on Russia : युक्रेनचा रशियावर पुन्हा मोठा ड्रोन हल्ला; तेल शुद्धीकरण कारखाना, लष्करी तळांना केले लक्ष्य

युक्रेनने शनिवारी रात्री उशीरा रशियावर आणखी एक मोठा ड्रोन हल्ला(Ukraine Drone attack on Russia)केला. ज्यामध्ये एकाचवेळी शेकडो ड्रोन डागण्यात आले. युक्रेनने सेंट पीटर्सबर्ग जवळील तेल शुद्धीकरण कारखाना (ऑईल रिफायनरी) आणि लष्करी तळांना लक्ष्य केले.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मान्य केले आहे की, या हल्ल्यात सुमारे ५०० ड्रोनचा समावेश होता.(Ukraine Drone attack on Russia)

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (volodymyr zelenskyy) यांनी ‘X’ वर या हल्ल्याचा एक व्हिडिओ देखील जारी केला आहे. यामध्ये सेंट पीटर्सबर्ग बंदरावर असलेल्या एका तेल सुविधेमधून धुराचे मोठे लोट उठताना दिसत आहेत.(Ukraine Drone attack on Russia)

अम्युकातील वृत्तवाहिनी ‘एबीसी न्यूज’च्या अहवालानुसार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले की, युक्रेनने सेंट पीटर्सबर्ग बंदरावरील तेल सुविधेसह क्रोनस्टॅड नौदल तळासमोरील लष्करी तळांवर यशस्वीपणे हल्ला केला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, या हल्ल्यात लांब पल्ल्याच्या सुमारे ५०० ड्रोनचा वापर करण्यात आला होता. मॉस्कोच्या महापौरांनी सांगितले की, २०० ड्रोननी रशियाच्या राजधानीला लक्ष्य केले होते. युक्रेन आता रशियाच्या हद्दीत आतपर्यंत घुसून तेल शुद्धीकरण कारखाने, पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) आणि संरक्षण उद्योग केंद्रांवर जवळपास रोजच यशस्वीपणे हल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये युक्रेन लांब पल्ल्याच्या ड्रोनचा वापर करत आहे.(Ukraine Drone attack on Russia)

( – Nagpur Crime : मोबाईल, पर्स नाही…तर पठ्ठ्याने थेट 2 कोटींची 'ई-बस' केली लंपास; पोलिसांनी कसा लावला बस चोराचा शोध? )

रशियामध्ये इंधनाचा तुटवडा आणि आणीबाणीची स्थिती

अहवालानुसार, युक्रेनच्या या हल्ल्यांनंतर रशियाच्या अनेक भागांमध्ये इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. लोक गॅस स्टेशनवर (पेट्रोल पंपांवर) लांबच लांब रांगेत उभे राहून स्वतःचे व्हिडिओ बनवत आहेत. त्याचवेळी, युद्धाच्या मैदानातही रशियाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मध्यम पल्ल्याच्या ड्रोनचा वापर करून युक्रेनने सुरू केलेली ही प्रभावी मोहीम रशियाच्या लॉजिस्टिक्सला (पुरवठा साखळी) लक्ष्य करत आहे आणि रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रिमियामधील पुरवठा मार्ग खंडित करण्याचा प्रयत्न करत आहे.

क्रिमियामधील अधिकाऱ्यांनी इंधनाच्या टंचाईमुळे आणीबाणीची (इमर्जन्सी) घोषणा केली असून, युक्रेनच्या हल्ल्यांमुळे झालेल्या वीज पुरवठ्यातील खंडामुळे तिथे संचारबंदी (कर्फ्यू) लागू केली आहे.(Ukraine Drone attack on Russia)

पुतिन यांची लष्करी तळाला भेट; डोनबासमध्ये यशाचा दावा

या दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी रात्रीच्या वेळी लष्करी गणवेश परिधान करून एका लष्करी तळाला भेट दिली. रशियन सैन्याने शनिवारी दावा केला की, त्यांनी युक्रेनच्या पूर्व डोनबास प्रदेशातील एक महत्त्वाचे संरक्षण केंद्र असलेल्या ‘कोस्टियान्टिनिव्का’ शहरावर ताबा मिळवला आहे. आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते, जर हा दावा खरा असेल तर हे रशियासाठी मोठे यश मानले जाऊ शकते. मॉस्कोचे या वर्षातील युद्धाच्या मैदानावरील हे पहिले मोठे यश असेल.(Ukraine Drone attack on Russia)

“रशिया अत्यंत संथ गतीने पुढे सरकत आहे आणि कदाचित मे महिन्यात त्यांनी जेवढा भाग जिंकला होता, त्यापेक्षा जास्त भाग त्यांनी गमावला असण्याची शक्यता आहे.”(Ukraine Drone attack on Russia)

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post