Dailyhunt

Unseasonal Rain : बळीराजावर आसूड! हजारो हेक्टरवरील पिकांची धूळदाण, आता साकडं थेट सरकारला

  • प्रतिनिधी

धाराशिव : निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका पुन्हा एकदा जिल्ह्याला बसला असून, मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने(Unseasonal Rain)शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे.

वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या या संकटामुळे जिल्ह्यातील तब्बल १४०७ हेक्टरवरील उभी पिके आडवी झाली असून, या भीषण नुकसानीचा प्राथमिक अहवाल आता प्रशासनाकडून शासनाकडे धाडण्यात आला आहे.(Unseasonal Rain)

( – IPL 2026 : विराट कोहलीच्या नावावर टी-२० प्रकारातील अनोखा विक्रम, रोहितला टाकलं मागे )

​जिल्ह्यात सलग पडणाऱ्या अवकाळीने केवळ रब्बी हंगामातील पिकांचेच नव्हे, तर बागायती आणि जिरायती क्षेत्रातील फळबागांचेही अतोनात नुकसान केले आहे. कृषी विभागाने तातडीने पावले उचलत मार्च महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून, त्याचा अहवाल मदतीसाठी राज्य सरकारकडे सुपूर्द केला आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात झालेल्या पावसाने जे नवीन संकट उभे केले आहे, त्याचे पंचनामे करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.(Unseasonal Rain)

​ऐन काढणीच्या वेळी निसर्गाने दिलेल्या या धक्क्यामुळे बळीराजा पूर्णपणे कोलमडला आहे. डोळ्यादेखत सोन्यासारखे पीक मातीत मिसळल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून, आता सरकारकडून लवकरात लवकर आर्थिक मदतीचा हात मिळावा, अशी आर्त हाक जिल्ह्यातून दिली जात आहे. शासनाकडे गेलेल्या या प्राथमिक अहवालानंतर आता प्रत्यक्षात मदतीचे वाटप कधी होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(Unseasonal Rain)

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post