ऋजुता लुकतुके
वेस्ट इंडिजचा माजी धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला(Vaibhav Sooryavanshi)"न्यू सिक्स मशीन" असे नवे टोपणनाव दिले आहे.
आयपीएल २०२६ बाद फेरीच्या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध वैभवने केलेल्या विस्फोटक खेळीनंतर गेलने त्याचे कौतुक केले. वैभवने या सामन्यात २९ चेंडूंत ९७ धावा केल्या. त्यामुळे राजस्थानने आठव्या षटकातच शतकी मजल मारली होती.(Vaibhav Sooryavanshi)
फक्त १५ वर्षांच्या वैभवने या हंगामात एक शतक आणि ६ अर्धशतकं करताना ऑरेंज कॅपही सध्या नावावर केली आहे. कालच्या खेळीत त्याने १२ षटकार आणि ५ चौकार लगावत राजस्थान रॉयल्सला मोठा विजय मिळवून दिला. या सामन्यात त्याने ख्रिस गेलचा एका आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकारांचा १४ वर्ष जुना विक्रमही मोडला.(Vaibhav Sooryavanshi)
ख्रिस गेलने सोशल मीडियावर पोस्ट करत "आउटस्टँडिंग वैभव, न्यू सिक्स मशीन" अशा शब्दांत त्याचे अभिनंदन केले. गेलच्या या प्रतिक्रियेनंतर क्रिकेटविश्वात वैभवची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.(Vaibhav Sooryavanshi)

आयपीएल २०१२ मध्ये ख्रिस गेलने ५९ षटकारांचा विक्रम केला होता. मात्र वैभवने सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यात हा टप्पा ओलांडत नवीन इतिहास रचला. सध्या त्याच्या नावावर एका हंगामात ६५ षटकारांची नोंद झाली आहे, जी आयपीएल इतिहासातील सर्वोच्च कामगिरी मानली जात आहे.(Vaibhav Sooryavanshi)
वैभव सूर्यवंशीचा आक्रमक फलंदाजीचा अंदाज आणि निर्भीड खेळ यामुळे तो या हंगामातील सर्वात मोठा स्टार ठरला आहे. विशेष म्हणजे, त्याने ख्रिस गेलचा सर्वात वेगवान आयपीएल शतकाचा विक्रम मोडण्याचीही जवळपास संधी निर्माण केली होती. मात्र तो अवघ्या तीन धावांनी शतकापासून दूर राहिला.(Vaibhav Sooryavanshi)
दरम्यान, राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामना जिंकत क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश केला असून संघाच्या विजयात वैभव सूर्यवंशीची खेळी निर्णायक ठरली.(Vaibhav Sooryavanshi)
हेही पहा –
