Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Veer Savarkar Jayanti 2026 : लोकभवनात राज्यपाल जिष्णु देव वर्मांकडून वीर सावरकरांना आदरांजली

  • प्रतिनिधी

Veer Savarkar Jayanti 2026 ​स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी मुंबईतील लोकभवन येथे एका विशेष अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या राष्ट्रभक्तीला आणि बलिदानाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. (Veer Savarkar Jayanti 2026)

​भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सावरकरांचे योगदान आजही देशवासियांसाठी प्रेरणादायी आहे. या स्मरणप्रसंगी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे यांच्यासह लोकभवनातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावरकरांच्या विचारांचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून नतमस्तक झाले. (Veer Savarkar Jayanti 2026)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post