कल्याण : प्रतिनिधी
देशासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या, स्वातंत्र्याच्या यज्ञात स्वतःला झोकून देणाऱ्या थोर क्रांतिवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त(Veer Savarkar Jayanti 2026)गुरूवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालय भारावून गेले होते.
महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना त्यांच्या त्यागाची, निष्ठेची आणि मातृभूमीवरील असीम प्रेमाची आठवण जागवली.(Veer Savarkar Jayanti 2026)
( – Vaibhav Sooryavanshi : ३ धावांनी शतक हुकल्यावर सूर्यवंशीची मोठी प्रतिक्रिया )
या प्रसंगी क्षणभर संपूर्ण सभागृह निःशब्द झाले होते. महापालिका भवनातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर सभागृहात असलेल्या भव्य तैलचित्रासमोर नतमस्तक होत महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी पुन्हा एकदा कृतज्ञतेची फुले वाहिली. यावेळी महापालिका सचिव किशोर शेळके, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सचिव कार्यालयातील अधीक्षक मधुकर भोये यांच्यासह उपस्थित प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या डोळ्यांत सावरकरांच्या बलिदानाविषयी आदर दाटून आला होता. सावरकरांचे विचार हीच आमची प्रेरणा, त्यांच्या मार्गावरूनच पुढे जाण्याचा निर्धार आम्ही करतो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. देशभक्तीच्या आठवणीने आणि त्यागाच्या स्मृतीने महापालिका परिसर काही काळ स्तब्ध झाला होता.(Veer Savarkar Jayanti 2026)
