Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Wari Update 2026: ३१८ वर्षांनी जालन्यात मुक्ताई पालखीचे प्रथमच रिंगण! भाविक-वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Wari Update 2026: तब्बल ३१८ वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या संत मुक्ताई पालखी सोहळ्यातील ऐतिहासिक रिंगण सोहळा रविवारी (५ जुलै) प्रथमच जालना शहरात पार पडला. सकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या या सोहळ्याला राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत भक्तिभावाने सहभाग नोंदविला.

हरिनामाच्या गजराने, टाळ-मृदुंगाच्या निनादाने आणि अभंगांच्या सुरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. संत मुक्ताई पालखीचे जालन्यात शनिवारी आगमन झाल्याने वारकरी तसेच नागरिकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते. रिंगण सोहळा सुरू होताच “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “मुक्ताई माऊली”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. पालखीचे दर्शन घेण्यासाठी आणि ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Ukraine Drone attack on Russia : युक्रेनचा रशियावर पुन्हा मोठा ड्रोन हल्ला; तेल शुद्धीकरण कारखाना, लष्करी तळांना केले लक्ष्य

रिंगण सोहळ्यात विविध दिंड्या, फडकरी, महिला वारकरी आणि युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, टाळ-मृदुंगाचा गजर, हरिपाठ आणि अखंड नामस्मरणामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले. वारकरी परंपरेतील समता, सेवा आणि भक्तीचा संदेश या सोहळ्यातून अनुभवायला मिळाला. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षा, वाहतूक नियंत्रण, आरोग्य सेवा आणि पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था केली होती. विविध सामाजिक संस्था व स्वयंसेवकांनी वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या.

३१८ वर्षांच्या संत मुक्ताई पालखी परंपरेत प्रथमच जालना येथे पार पडलेला हा ऐतिहासिक रिंगण सोहळा वारकरी संप्रदायाच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षण ठरला. हजारो भाविकांनी या सोहळ्याचा आनंद घेत भक्ती, श्रद्धा आणि वारकरी संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post