Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
३८५ कामांसाठी २८ कोटी ८९ लाख मंजूर; यवतमाळ, उमरखेडला झुकतेमाप

३८५ कामांसाठी २८ कोटी ८९ लाख मंजूर; यवतमाळ, उमरखेडला झुकतेमाप

वतमाळ, 01 ऑगस्ट (हिं.स.)जिल्हा नियोजन समितीतून यंदा जनसुविधा योजनेत ३८५ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. यात यवतमाळ आणि उमरखेड तालुक्याला प्रत्येकी ६३ कामे देवून अतिशय झुकतेमाप दिले आहे.

यात उमरखेड तालुक्यातील केवळ तब्बल ३०, तर यवतमाळातील सहा कामांना अद्यापही मुहूर्त मिळाला नाही. ही कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश देण्यात आले आहे. अद्यापपर्यंत ७९ कामे थंडबस्त्यात पडून आहेत.

जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्!या जनसुविधा ३८५ कामासाठी तब्बल २८ कोटी ८९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने स्मशानभुमी सौंदर्यीकरण, शेड, सिमेंट रोड, नाली, समाजमंदिर आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. या कामाला प्रत्यक्षात सुरवात करण्यात आली. कधी नव्हे, तर पहिल्यांदाच जनसुविधा योजनेच्या कामामध्ये यवतमाळ आणि उमरखेड तालुक्याला झुकतेमाप देण्यात आले आहे. दोन्ही तालुक्याला मिळून ६३ कामे मंजूर केली. त्यापाठोपाठ ३४ महागाव, पुसद २८, घाटंजी, केळापूर प्रत्येकी २७, दारव्हा २६, कळंब २४, आर्णी, बाभूळगाव, राळेगाव तालुक्याला प्रत्येकी २२, दिग्रस ११, नेर १२, तर मारेगाव आणि झरी तालुक्याला प्रत्येकी दोन कामे मंजूर करण्यात आली आहे.

प्रत्यक्षात कामाला सुरवात होऊन बराच अवधी लोटला आहे. आजघडीस १७३ कामे पूर्णत्वास आले आहे. तर विविध कारणामुळे तब्बल ७९ कामे थंडबस्त्यात पडली आहे. या कामांना कधी मुहूर्त मिळणार, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. विशेष म्हणजे झुकतेमाप दिलेल्या उमरखेड तालुक्यातील केवळ आठ कामे पूर्ण झाली आहे. १५ कामे प्रगतिपथावर, दहा कामे निविदा प्रक्रियेत आहेत. तर ३० कामांना अद्यापही सुरवात झाली नाही. परंतु यवतमाळ तालुक्यातील ३६ कामे पूर्ण झाली, १३ प्रगतिपथावर, आठ निविदा, तर सहा कामे सुरू झाली नाही. सुरू न झालेल्यामध्ये बाभूळगाव, पुसद, राळेगाव प्रत्येकी एक, दारव्हा १३, दिग्रस, कळंब, केळापूर प्रत्येकी दोन, घाटंजी १२, महागाव तीन, नेर सहा, अशा एकूण ७९ कामांचा समावेश आहे. ही अपूर्ण कामांसह प्रगतिपथावरील आणि निविदा प्रक्रियेतील कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

---------------------

स्मशानभुमीला प्राधान्य देणे गरजेचे

जिल्ह्यातील दीडशेहून अधिक गावात स्मशानभुमी नाही. परिणामी, उघड्यावर अंत्यविधी पार पाडण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन प्रशासनाने प्रत्येक गावात स्मशानभुमी निर्माण करणे आवश्यक आहे. मात्र, बर्!याचवेळा जनसुविधा सारख्या योजनेतून सिमेंट रोड, नाली, सौंदर्यीकरण, संरक्षण भिंत आदी कामांना प्राधान्य दिल्या जात आहे.

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi