Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आदिवासी मन्नेरवारलू महासंघाचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा

आदिवासी मन्नेरवारलू महासंघाचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा

नांदेड, १ सप्टेंबर (हिं.स.) : मयूर टॉकीज, नांदेड येथे आदिवासी मन्नेरवारलू महासंघाची सहावी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महासंघाच्या वतीने मांडण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

उपस्थित पदाधिकारी व सदस्यांच्या सहमतीने बैठकीतील सर्व विषयांवर एकमताने निर्णय घेण्यात आले.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला आदिवासी मन्नेरवारलू महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला.

या निर्णयाच्या अनुषंगाने लवकरच आदिवासी मन्नेरवारलू महासंघाचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन महासंघाच्या वतीने पाठिंब्याचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करणार असल्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.

तसेच विधेयक क्रमांक ६१ रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित मंत्री तसेच शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन महासंघाची भूमिका ठामपणे मांडण्याचा निर्णयही घेण्यात आला.

बैठकीत महासंघाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर पुढील काळात अधिक प्रभावीपणे पाठपुरावा करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी महासंघाच्या भूमिकेला एकमताने समर्थन देत संघटितपणे पुढील लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi