Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आईसाहेब लॉन्स, पिरसावंगी फाटा, बदनापूर येथे आ. नारायण कुचे यांनी केली पाहणी

आईसाहेब लॉन्स, पिरसावंगी फाटा, बदनापूर येथे आ. नारायण कुचे यांनी केली पाहणी

त्रपती संभाजीनगर, 31 जुलै (हिं.स.)। आईसाहेब लॉन्स, पिरसावंगी फाटा, बदनापूर येथे आमदार नारायण कुचे यांनी पाहणी केली.

छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान समाधान शिबिर अभियान अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आईसाहेब लॉन्स, पिरसावंगी फाटा, बदनापूर येथे कार्यक्रमस्थळाची पाहणी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात आवश्यक सुविधा, नागरिकांसाठी करण्यात येणारी व्यवस्था, विविध शासकीय विभागांमधील समन्वय, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा तसेच कार्यक्रम सुरळीत व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचावा आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान समाधान शिबिर अभियान यशस्वी व्हावे, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi