नांदेड, 30 मे (हिं.स.)।
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बल प्रवासी सेवा व सुरक्षेबाबतची आपली बांधिलकी सातत्याने जपत असून, हरवलेल्या वस्तूंचा शोध घेऊन त्या त्यांच्या योग्य मालकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अमानत अंतर्गत पुन्हा एकदा उल्लेखनीय कार्य केले आहे.
आदिलाबादमधील कुंभाजेरी गावातील रहिवासी गणेश जुनागरी दयाकर (वय 23 वर्षे) यांनी किनवट रेल्वे स्थानकावर माहिती दिली की, आदिलाबाद ते बोलारम प्रवासादरम्यान गाडी क्रमांक 17406 मधून त्यांचा मोबाईल फोन चुकून खाली पडला. माहिती मिळताच आरपीएफ कर्मचाऱ्यांनी तत्काळ आदिलाबाद स्थानकाजवळ शोधमोहीम राबवून रेल्वे रुळांवर पडलेला मोबाईल शोधून काढला. मोबाईल काही प्रमाणात खराब झालेला असला तरी तो सुरक्षितपणे जप्त करून आरपीएफ किनवटच्या ताब्यात ठेवण्यात आला. आवश्यक पडताळणीनंतर सुमारे 15 हजार किंमतीचा मोबाईल
प्रवाशाचे वडील गुंजाती शंकर दयाकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याबद्दल कुटुंबीयांनी आरपीएफच्या तत्पर व प्रामाणिक कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले.
चढल्यानंतर घाईघाईने उतरतानाच सामान्य डब्यात आपली ट्रॉली दुसऱ्या घटनेत, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी शनी राज यांनी चुकीच्या गाडीत बॅग विसरल्याची माहिती दिली. ही घटना छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर घडली. माहिती मिळताच आरपीएफ कर्मचाऱ्यांनी तातडीने समन्वय साधून संबंधित गाडी जालना रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर ट्रॉली बॅगचा शोध घेतला. बॅग सुरक्षितपणे हस्तगत करून आरपीएफ पोस्ट जालना येथे आणण्यात आली. ओळख पडताळणीनंतर ती संबंधित प्रवाशाकडे सुपूर्द करण्यात आली. सदर बॅगेमध्ये रोख रक्कम, चांदीचे दागिने, नवीन साड्या, मुलांचे कपडे तसेच इतर वैयक्तिक साहित्य होते. या सर्व वस्तूंची एकूण किंमत अंदाजे 29 हजार 600 होती. आपले सामान परत मिळाल्याने प्रवाशाने आरपीएफच्या तत्परतेचे व कार्यक्षमतेचे कौतुक करून आभार व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis
