Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अमरावती विधानपरिषद निवडणूक - काँग्रेसकडून हर्षजित देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अमरावती विधानपरिषद निवडणूक - काँग्रेसकडून हर्षजित देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मरावती, 30 मे (हिं.स.) - अमरावती विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नागपूर येथील प्रसिद्ध उद्योजक असलेले देशमुख यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत नामांकन भरले.

यावेळी खासदार बळवंत वानखडे, काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. महाविकास आघाडीने अमरावती विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून हर्षजित देशमुख यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे हर्षजित देशमुख यांच्यात थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हर्षजित देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना भाजपमध्ये प्रचंड अंतर्गत कलह असल्याचा आरोप केला. या परिस्थितीचा फायदा महाविकास आघाडीला होईल आणि या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल, असा दावा त्यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi