Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अमरावतीत अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रकल्पाला हिरवा कंदील

अमरावतीत अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रकल्पाला हिरवा कंदील

मरावती, 01 ऑगस्ट (हिं.स.) | पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही व्हावा. याकरिता राज्य शासनाच्या गृहविभागाने सकारात्मक पावले उचलली असून, उच्चस्तरीय समितीचे या प्रकल्पासाठी हिरवी झेंडी दिली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी दिली.

वाढते अपघात व गुन्हेगारांवर नियंत्रण राहण्यासाठी पावल उचलावी, अशी मागणी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली. तेव्हा पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी त्यांना अशा घटनांवर एकाच ठिकाणावरून नियंत्रण ठेवण्यासाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रकल्प शहरामध्ये लवकरच कार्यान्वित होईल. अशी माहिती दिली.

त्यामुळे विना क्रमांकाच्या अवजड वाहनांची नो-एन्ट्री मध्ये वाहतूक होत असेल तर, त्यावर एकाच ठिकाणीवरुन नियंत्रण ठेवून संबंधितांना सूचीत केल्या जाईल. आतापर्यंत शहरातील सीसीटीव्ही प्रकल्पाला निधी कुणी उपलब्ध करून द्यावा हे निश्चित होत नव्हते. गृहविभागाकडे हा प्रस्ताव नव्याने पाठविल्यानंतर त्यांच्या उच्चस्तरीय समितीने सकात्मकता दाखविली असून, पुरवणी अर्थसंकल्पामध्ये तशी तरतूद होऊन काम सुरू झालेले दिसेल. असेही पोलिस आयुक्तांनी यावेळी सांगितले. ४०० वर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा १२८ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्या गेला होता. त्यावर आतापर्यंत बरेच दिवस शासनाच्या तांत्रिक समितीकडे खल सुरू होता. आता नव्याने गृहविभागाने पुढाकार घेतल्याचे सीपींनी स्पष्ट केले.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi