Dailyhunt
अमरावतीत देहव्यापारावर पोलिसांचा छापा; तिघे ताब्यात

अमरावतीत देहव्यापारावर पोलिसांचा छापा; तिघे ताब्यात

मरावती, 07 एप्रिल (हिं.स.)। अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीतील यशोदा नगर क्रमांक १, गल्ली क्रमांक २ येथील एका घरात सुरू असलेल्या देहव्यापारावर पोलिसांनी रात्री धाड टाकून कारवाई केली.

या छाप्यात दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणात महिला मालकीणसह दोन ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संबंधित घरात बेकायदेशीररित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले. कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावेही जप्त केले आहेत. या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या ग्राहकांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई प्रभारी अधिकारी दीप्ती ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकातील महिला पोलिसांनी केली. या मोहिमेत महिला पोलिसांचा सक्रिय सहभाग दिसून आला. पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करीत आहेत. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi