Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अमरावतीत जनगणना कामाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा

अमरावतीत जनगणना कामाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा

मरावती, 28 मे (हिं.स.) : जनगणना संचालनालयाचे उप महारजिस्ट्रार यशवंत पाटील तसेच उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी योगेश पीठे यांनी बुधवारी शहरातील पाचही झोनला भेट देऊन सुरू असलेल्या जनगणना कामाचा सविस्तर आढावा घेतला.

या दौऱ्यादरम्यान त्यांनी जनगणना कक्ष तसेच विविध गटांना प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. प्रगणक आणि पर्यवेक्षकांशी थेट संवाद साधत माहिती संकलन प्रक्रियेची सद्यस्थिती, कामाची प्रगती तसेच येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

कामाची गती, अचूकता आणि निर्धारित वेळेत उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत अधिकाऱ्यांनी विशेष माहिती घेतली. प्रगणकांकडून जमा होणारी माहिती पर्यवेक्षकांनी अत्यंत काटेकोरपणे तपासून व शहानिशा करूनच पुढील प्रक्रियेसाठी पाठवावी, असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले.

माहितीची गुणवत्ता आणि अचूकता राखणे अत्यंत महत्त्वाचे असून कोणतीही त्रुटी राहू नये, यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष भर दिला. तसेच जनगणना प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी आणि पारदर्शक वापर करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

क्षेत्रीय स्तरावर समन्वय राखणे आणि वेळेचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. या भेटीदरम्यान सहायक आयुक्त नंदकिशोर तिखिले, भूषण पुसतकर, नितीन बोबडे, धनंजय शिंदे, मनोज शहाळे तसेच सहायक जनगणना अधिकारी अक्षय निलंगे उपस्थित होते.

------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi