Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

अमरावतीत महावितरणचे लाचखोर उपअभियंता व ऑपरेटर अटकेत

मरावती, 30 एप्रिल (हिं.स.) : सोलर रूफटॉप विक्री व पुरवठा नोंदणीसाठी १५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यासह संगणक ऑपरेटरला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.

बाळासाहेब दिगंबर खंडारे (वय ४८), उपकार्यकारी अभियंता आणि श्यामकुमार पांडुरंग इझाटे (वय ४२), संगणक ऑपरेटर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बुधवारी रात्री लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली, अशी माहिती विभागाचे अधीक्षक बापू बांगर यांनी दिली.

तक्रारदार हा सोलर पॅनल फिटिंग व्यवसाय करणारा असून, त्याने नोंदणीसाठी महावितरण कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जाच्या मंजुरीसाठी उपअभियंता खंडारे यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर १५ हजार रुपयांवर व्यवहार ठरला.तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्वीकारताना संगणक ऑपरेटर इझाटे याला पकडण्यात आले. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली.

या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. तसेच अटक करण्यात आल्यानंतर दोन्ही आरोपींच्या घरांची झडतीही घेण्यात आली. पोलिस उपअधीक्षक मंगेश मोहोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi