Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अमरावतीत मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात

अमरावतीत मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात

अमरावती, 27 ऑगस्ट (हिं.स.)।

मरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर नेते सामाजिक कार्यकर्ते अर्जुन महानर यांनी धनगर समाजाच्या विविध मागण्या संदर्भात अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे..

त्यांच्या या आंदोलनाला हजारो मेंढपाळांनी पाठिंबा देत उपोषण मंडपात एकच गर्दी केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात मेंढी चराई शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, राज्य शासनाने काढलेल्या २४ ऑगस्ट रोजी शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी..स्थानिक परिस्थितीनुसार उपलब्ध होणाऱ्या वनक्षेत्रात चराईची परवानगी देण्याचे निर्देश द्यावे, सर्व जिल्ह्यांमध्ये मेंढी चराईसाठी उपलब्ध असलेले वनक्षेत्र, गायरान, E-Class, झुडपी व पडीक जमीन तात्काळ निश्चित करून त्याची तालुकानिहाय यादी जाहीर करावी. यापूर्वी वनमंत्री गणेश नाईक आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या मुंबईत बैठकीमध्ये राज्य सरकारने मेंढपाळ बांधवांसाठी जीआर काढला मात्र त्याची अंमलबजावणी नीट केली जात नाही असा आरोप करण्यात आला त्यामुळे यान शासन निर्णयाची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन महानर यांनी अमरावतीमध्ये अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi