Dailyhunt
अमरावतीत फूटपाथवरील लोटगाड्यांवर मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाईत ७६ जण ताब्यात

अमरावतीत फूटपाथवरील लोटगाड्यांवर मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाईत ७६ जण ताब्यात

अमरावती, 30 एप्रिल (हिं.स.)।

हरातील फूटपाथवर खाद्यपदार्थ विक्रीच्या बऱ्याच लोटगाड्यांवर मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केल्या जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत ७६ जणांना अटक केली.

शहरातील कठोरा नाका, किशोर कॉलनी, दस्तूरनगर चौक, सिंधी चौक, चवरेनगर, जिल्हा परिषद कन्या शाळा चौक, ऑर्बिट पॉइंटसह इतरही सार्वजनिक ठिकाणी सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत अंडाविक्री, चायनीजसह इतर खाद्यपदार्थ विक्रीच्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल राहते. त्याचा फटक या भागात येणाऱ्या सामान्य नागरिकांसह इतर महिला व युवतींना बसतो. अनेक ठिकाणी सर्रास मद्यप्राशन केल्या जात असल्यामुळे वाहतुकीच्या प्रश्नासह कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अनेक ठिकाणी छेडखानीचे प्रकार घडतात. त्यातून पोलिसांकडे तक्रारीत वाढ होत असल्याने आता गुन्हे शाखेकडून शहराच्या विविध चौकात, गर्दीच्या ठिकाणी नियमबाह्य कृत्य करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कडक कारवाई सुरूच राहील, असे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi