Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अंबडगाव जिल्हा परिषद शाळेसाठी दोन नवीन वर्गखोल्यांना २४ लाखांचा निधी

अंबडगाव जिल्हा परिषद शाळेसाठी दोन नवीन वर्गखोल्यांना २४ लाखांचा निधी

त्रपती संभाजीनगर, २७ ऑगस्ट (हिं.स.) : अंबडगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोन नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकासकामाचे भूमिपूजन शाळेतील विद्यार्थिनीच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दर्जेदार व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच त्यांना सुरक्षित आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण मिळावे, या उद्देशाने नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे.

यावेळी उपस्थितांनी शिक्षणाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणाची भक्कम पायाभरणी ही गावाच्या उज्ज्वल भवितव्याची गुरुकिल्ली असून, शैक्षणिक सुविधांच्या विकासाला सातत्याने प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहील, असे सांगण्यात आले.

भूमिपूजन कार्यक्रमाला भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, बदनापूर तहसीलदार हेमंत तायडे, ए.आर. बेरा, महावितरणचे शाखा अभियंता पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष भगवान मात्रे, पद्मकर जऱ्हाड, भगवान बारगाजे, राजेंद्र बापू जऱ्हाड, उद्धव काळे, रवीकुमार बोचरे, बाबासाहेब कराळे, विनोद मगरे, पप्पू कुलकर्णी, शेळके, नंदू शेळके, ताराचंद फुलमाळी, नंदू दाभाडे, विष्णू कोल्हे, संतोष वरकड, अनिल हिवाळे आणि श्रीमंत बापू जऱ्हाड यांच्यासह शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi