Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अमृतांजन हेल्थकेअर कंपनीचा पर्सनल केअर क्षेत्रात विस्तार; वेदनाशामक उत्पादनांची वाढवली श्रेणी

अमृतांजन हेल्थकेअर कंपनीचा पर्सनल केअर क्षेत्रात विस्तार; वेदनाशामक उत्पादनांची वाढवली श्रेणी

मुंबई, 28 मे (हिं.स.)। अमृतांजन हेल्थकेअर कंपनी ही रुग्णांच्या शरीरावरील वेदना कमी करण्यासाठी खात्रीलायक उपाय देणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ अमृतांजन हेल्थकेअर कंपनीने आपला हा ठसा उमटवला आहे.

कंपनीने आता 'कॉम्फी रेइर' आणि 'ऑर्थो ऑईल' लाँच करण्याची घोषणा केली आहे. या दोन नव्या उत्पादनांमुळे कंपनीने वैयक्तिक सौंदर्य संवर्धन (पर्सनल ग्रुमिंग) क्षेत्रातही प्रवेश केला आहे. नव्या उत्पादनांच्या उपलब्धतेमुळे वेदना उत्पादन क्षेत्रातही आपले स्थान सक्षम होईल, असा विश्वास कंपनीच्यावतीने व्यक्त करण्यात आला.

या व्यावसायिक विस्ताराच्या केंद्रस्थानी 'कॉम्फी' हा ब्रँण्ड आहे. महिलांसाठी दर्जेदार वैयक्तिक उत्पादने उपलब्ध करुन देणे याकरिता या ब्रँण्डची निर्मिती करण्यात आली आहे. 'पॉवर टू बी यू' या विश्वासावर हा ब्रँण्ड आधारलेला आहे. सध्या बाजारात महिलांसाठी परवडणा-या दरात रेझर्स उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक महिलांना पुरुषांचे रेझर्स वापरावे लागतात. ही कमतरता आता 'कॉम्फी'च्या निमित्ताने दूर सारली जाईल.

या उत्पादन श्रेणीत 'क्लोज एण्ड क्लीन' या रेझरचा समावेश होतो. 'क्लोज एण्ड क्लीन' हा भारतातील महिलांसाठी सर्वात स्वस्त रेझर असून, त्याची किंमत केवळ २० रुपये आहे. 'सिल्की स्मूथ' या प्रिमियम दर्ज्याच्या रेझरची किंमत केवळ ५० रुपये आहे. बाजारातील इतर सामान उत्पादनांच्या तुलनेत ही किंमत जवळपास ५० टक्क्यांहूनही कमी आहे. गुणवत्तेशी तडजोड न करता महिलांना आरामदायी सुविधांचा अनुभव देण्यासाठी या रेझरची निर्मिती करण्यात आली आहे. कोट्यावधी महिला ग्राहकांना दर्जेदार वैयक्तिक स्वरुपातील उत्पादने परवडणा-या किंमतीत उपलब्ध करुन देणे, हाच यामागील मुख्य उद्देश आहे.

वरील सर्व श्रेणातील रेझर दक्षिण कोरियाच्या डोर्को कंपनीकडून मागवले जाते. ही कंपनी जगातील अग्रगण्य रेझर उत्पादनांपैकी एक आहे. यामुळे सर्व उत्पादनांमध्ये उच्च दर्जा आणि उत्कृष्ट कामगिरीची हमी मिळते. ग्राहकांना उत्तम दर्जाचा अनुभव देण्यासाठी या रेझरची निवड करण्यात आली आहे. सर्व उत्पादने आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार तयार केली जातात.

अमृतांजन कंपनीने पर्सनल ग्रूमिंग क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. याचसोबत कंपनीने वेदना व्यवस्थापन क्षेत्रातही आपले स्थान मजबूत केले आहे. यासाठी कंपनीने ऑर्थो ऑईल बाजारात आणले आहे. हे तेल शरीरातील दुखणे आणि स्नायूंच्या अकडण्यावर प्रभावीपणे काम करते. रुग्णाला सांधेदुखीच्या त्रासातूनही मुक्तता मिळते.

विविध वनौषधींच्या मिश्रणातून 'ऑर्थो ऑईल' तयार करण्यात आले आहे. या तेलाची परिणामकारकता क्लिनिकल चाचण्यांद्वारे सिद्ध झाली आहे. या तेलाच्या नियमित वापरामुळे सांधेदुखी आणि इतर वेदनांपासून मोठा दिलासा मिळतो. हे उत्पादन प्रामुख्याने ४५ ते ६० वयोगटातील लोकांसाठी उपयुक्त ठरते. बदलती जीवनशैली, वाढते वय आणि मानसिक ताणामुळे या वयोगटातील व्यक्तींना असह्य वेदना होतात. अशा लोकांसाठी हे तेल प्रभावी ठरते.

अमृतांजन हेल्थकेअरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. एस. शंभू प्रसाद म्हणाले, "आम्ही अमृतांजनमध्ये केवळ वेदनाशामक उत्पादनांपुरते मर्यादित न राहता ग्राहकांच्या रोजच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या दर्जेदार उत्पादनांचा विस्तार करत आहोत. 'कॉम्पी रेझर्स' आणि अमृतांजन 'ऑर्थो ऑइल' यांसारख्या नवीन उत्पादनांच्या माध्यमातून ग्राहकांना परवडणारी आणि उच्च दर्जाची उत्पादने उपलब्ध करुन देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. ही उत्पादने ग्राहकांना वेदनामुक्त हालचालींसाठी मदत करतील, त्यांचा आत्मविश्वास वाढवतील. त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुसह्य व आरामदायी करतील."

या नवीन उत्पादनांच्या लाँचसह अमृतांजन कंपनीने दैनंदिन आरोग्य सेवांच्या क्षेत्राही विस्तार केला आहे. अमृतांजन हेल्थकेअर कंपनीचा भारतीय ग्राहकांना विश्वासार्ह आणि परवडणारी उत्पादने देण्याचा वारसा आहे. हा वारसा जपतच कंपनीने ग्राहकांसाठी नवनवीन पर्याय आणले आहेत. यामुळे अमृतांजनाची बाजारपेठेतील पकड अधिक मजबूत होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi