हिवरखेड(अकोला), 7 जुलै(हिं.स.) रेल्वे माल वाहतूक वाढविण्या करिता रेल्वे बोर्डाने दिलेल्या दिशा निर्देशानुसार नांदेड रेल्वे विभागात बिजिनेस डेवलोपमेंट युनिट गठीत करण्यात आले आहे. हे बिजिनेस डेवलोपमेंट युनिट (बी.डी.यु.) नांदेड रेल्वे विभागातील पारंपारिक रेल्वे माल वाहतूक जसे कि कांदा, मका, साखर, सरकी, इत्यादीची वाहतूक वाढविण्या बरोबरच अपारंपारिक माल वाहतूक तसेच छोटी छोटी माल वाहतूक रेल्वे मध्ये वाढविण्याकरिता कार्य करेल. ए. श्रीधर, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक, नांदेड हे या कार्य समितीचे संयोजक असतील. त्यांच्या सोबत या समितीचे सदस्य म्हणून पी. दिवाकर बाबू, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, उदयनाथ कोटला, वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक शेख मोहमद अनिस, वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता हे काम पाहतील.
हिंदुस्थान समाचार
