Dailyhunt

औरंगाबाद जिल्ह्यात दुपारपर्यंत १८६ रुग्ण वाढले

औरंगाबद 13 जुलै (हिं.स) जिल्ह्यात दुपारी १२ वाजेपर्यंत १८६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ८६५० वर पोहोचली आहे. आजवर आढळलेल्या रूग्णांपैकी ५०६१ रुग्ण बरे झाले आहेत. ३५४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या ३२३५ जणांवर उपचार सुरु आहेत. आज आढळलेल्या रूग्णांपैकी ९ रूग्ण हे शहराच्या विविध प्रवेश बिंदूवर करण्यात आलेल्या अँटिजेन चाचणीद्वारे केलेल्या तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. महापालिका हद्दीत १६८ रूग्ण आढळून आले आहेत.
हिंदुस्थान समाचार
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi