Monday, 13 Jul, 2.22 pm Hindusthan Samachar

मुख्य बातमी
औरंगाबादेत जिल्हाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची बैठक

औरंगाबाद 13 जुलै (हिं.स) : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासोबत दोन बैठका घेतलेल्या लोकप्रतिनिधींची आज जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीला खा. डॉ. भागवत कराड, आ. प्रदीप जैस्वाल, आ. अतुल सावे, आ. सतीश चव्हाण, आ. अंबादास दानवे, आ.संजय शिरसाट आदींची उपस्थिती होती.

कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका लोकप्रतिनिधींनी ठेवला होता. केंद्रेकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शहरातील लोकप्रतिनिधींची नाराजी दूर झाली. मात्र दर सोमवारी विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. त्यानुसार गेल्या दोन बैठका विभागीय आयुक्तालयात पार पडल्या. यात संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनाची माहिती प्रशासनाकडून घेण्यात आली. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी काही सूचनाही प्रशासनाला केल्या होत्या.

आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक !

दरम्यान, दोन आठवडे विभागीय आयुक्तांसोबत बैठकीचा सिलसिला पार पडल्यानंतर आता आजची तिसरी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होत आहे. जिल्हाधिकारी चौधरी यांच्यासमवेत सकाळी अकराच्या सुमारास लोकप्रतिनिधींची बैठक सुरू झाली. आठवडाभर प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजना त्याचबरोबर अंटिजेन टेस्ट यासह शहरात स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सची माहितीही यावेळी लोकप्रतिनिधी देण्यात येणार असल्याचे समजते. हिंदुस्थान समाचार

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi
Top