Dailyhunt

बंगालमधील भाजप विजयाच्या चंद्रपूरच्या बंगाली कॅम्पमध्ये जल्लोष

चंद्रपूर, 06 मे (हिं.स.)। तृणमूल काँग्रेसच्या दादागिरी, अत्याचार आणि गुंडेशाहीच्या राजवटीला जनतेने लोकशाहीच्या माध्यमातून स्पष्ट नकार दिला आहे असे मत पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथील स्थानिक बंगाली कॅम्प प्रभागात आयोजित जल्लोष, आतिशबाजी व लाडु वाटप कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेळी कार्यकर्त्यांमार्फत फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. याप्रसंगी माजी उपमहापौर अनिल फुलझेले, सुभाष कासनगोट्टुवार, प्रकाश देवतळे, रघुवीर अहीर, शेखर शेट्टी, मनोज पाल, बलराम डोडाणी यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

ममता बॅनर्जी सरकारने बंगालचे मोठे नुकसान केले असून, देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण झाला होता. जनतेने हा धोका टाळला आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा पक्ष सर्व कार्यकर्ते, समर्थक आणि बंगालच्या जनतेचे हंसराज अहिर यांनी अभिनंदन केले.या कार्यक्रमास विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर,शाम कनकम यांचेसह अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi