Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बंगळूरु सलग दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन

बंगळूरु सलग दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन

-विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर गुजरातवर ५ गडी राखून विजय

अहमदाबाद, 31 मे (हिं.स.)विराट कोहलीच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दुसऱ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

विराट कोहलीने पुन्हा एकदा अंतिम सामन्यात आपल्या फलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाला गुडघे टेकायला भाग पाडलं. आणि गुजरात टायटन्सने ठेवलेलं 156 धावांचं लक्ष्य बंगळुरुच्या संघाने कोहलीच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर पार केलं. विराट कोहलीनं सिक्स लगावत आपल्या संघाला विजय साकारुन दिला. त्याने नाबाद 75 धावांची झंझावती खेळी खेळली.

तर गुजरात टायटन्सचं शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावण्याचं स्वप्न सत्यात उतरु शकलं नाही. गुजरातच्या फलंदाजांना बंगळुरुच्या गोलंदाजांनी 160 धावांचा टप्पाही गाठू दिला नाही. रसिक सलाम दार, भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडने गुजरातच्या संघाला 155 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. आणि त्यांना या सामन्यात कृणाल पांड्याचीही मोलाची साथ मिळाली.

आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने ८ गडी गमावून १५५ धावा केल्या. बंगळूरला सामना जिंकण्यासाठी १५६ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. वॉशिंग्टन सुंदरने ३७ चेंडूंमध्ये नाबाद ५० धावा करून एकहाती गुजरातचे नेतृत्व केले. आरसीबीकडून रसिक सलाम दारने तीन, भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडने प्रत्येकी दोन, तर कृणाल पांड्याने एक बळी घेतला.

गुजरातसाठी दिलासादायक बाब म्हणजे, वॉशिंग्टन सुंदरला जीवदान मिळाले. १० व्या षटकात, सुंदरने जेकब डफीच्या गोलंदाजीवर एक फटका मारला. बदली क्रिकेटपटू म्हणून मैदानात असलेल्या कॉक्सने चेंडू पकडण्यासाठी धाव घेतली, पण चेंडू जमिनीला लागला. सुंदर पॅव्हेलियनमध्ये परतलाही, पण तिसऱ्या पंचांनी त्याला नाबाद घोषित केले. त्यावेळी सुंदरने फक्त चार धावा केल्या होत्या. सुंदरने या संधीचा फायदा घेतला आणि अर्धशतक पूर्ण केले. सुंदर पाच चौकारांच्या मदतीने ३७ चेंडूंमध्ये ५० धावा करून नाबाद राहिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi