Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बर्थडे बॉयचा रस्त्यावर धांगडधिंगा; पोलीसांकडून गुन्हा दाखल

बर्थडे बॉयचा रस्त्यावर धांगडधिंगा; पोलीसांकडून गुन्हा दाखल

बीड, 24 ऑक्टोबर (हिं.स.)

वाढदिवस साजरा करण्यासाठी विनापरवाना डीजे वाजवून सार्वजनिक रस्त्यावर गर्दी जमविणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणे दोघांच्या अंगलट आले आहे. या प्रकरणी वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणासह डीजे चालकाविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी हा डिजेही जप्त केला आहे.

बीड शहरातील पंढरी नगरी परिसरात रात्री आठ ते साडे नऊ असा दिड तास डिजे लाऊन धांगडधिंगा सुरु होता. पोलिस पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना पंढरी नगरीत डीजे वाजविला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी

घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वाढदिवसानिमित्त मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याचे आढळून आले. तसेच वाढदिवसासाठी होर्डिंग आणि बॅनरही लावण्यात आले होते. पोलिसांनी चौकशी केली असता डीजे चालक करण नवनाथ जायभाये

(वय 28, रा. काकडहिरा, ता. पाटोदा) याने प्रशासनाची कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. विनापरवाना डीजे वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग करणे आणि रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. तसेच बर्थ डे बॉय सुरज जायभाये व करण जायभाये यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi